– अधिकाऱ्यांचे नांव व मोबाईल नंबरकरीता कार्यालयातील खटला विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, ५ ऑगस्ट : गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शालेय प्राधिकरण व स्कुल बस चालक/मालक तसेच सर्व जनतेस याद्वारे कळविण्यात येते की, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, गडचिरोली यांचे वतीने गडचिरोली जिल्ह्यातील शालेय प्राधिकरणाच्या बैठकीसाठी तसेच शालेय मुलांच्या वाहतुकीसंदर्भातील अडचणीबाबत तालुकानिहाय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तालुकानिहाय अधिकाऱ्यांचे नांव व मोबाईल नंबर माहित करुन घेण्यासाठी या कार्यालयातील खटला विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी केले आहे.