जिल्हा परिषदेच्या ५८१ रिक्त पदाकरिता २५ ऑगस्टपर्यंत अर्ज आमंत्रित

1034

The गडविश्व
गडचिरोली, ५ ऑगस्ट : जिल्हा परिषद, गडचिरोलीच्या आस्थापनेवरील गट – क संवर्गाची रिक्त पदे सरळ सेवेने भरण्यासाठी ५ ऑगस्ट २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर पदे जिल्हा परिषद, गडचिरोलीच्या अधिनस्त असलेल्या विविध विभागातील आहेत गट- क मधील विविध संवर्गाच्या एकूण ५८१ रिक्त पदाकरिता अर्ज करण्याचा कालावधी ५ ऑगस्ट ते २५ ऑगस्ट २०२३ पर्यंत आहे.
इच्छुक व पात्र उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या संकेतस्थळावर २५ ऑगस्ट २०२३ रोजी च्या रात्री २३.५९ वाजेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा. उपरोक्त जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशील, पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी जिल्हा परिषद, गडचिरोलीच्या www.zpgadchiroli.in या संकेतस्थळावर पाहण्यास उपलब्ध असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी कळविले आहे.
इच्छुक व पात्र उमेदवारास जाहीरात / पदभरती संबंधाने शंका, चौकशी करायची असल्यास अधिक माहिती करीता कार्यालयाचे हेल्पलाईन दुरध्वनी क्रमांक 07132-297463 वर कार्यालयीन वेळ सकाळी 9.45 ते सायं. 6.15 पर्यंत संपर्क साधता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here