करंट लागून जखमी झालेल्या माकडाला दिले जीवनदान

255

– वनविभाग व जलद बचाव सदस्यांचा पुढाकार
The गडविश्व
गडचिरोली, ८ ऑगस्ट : शहरातील चामोर्शी मार्गावरील हनुमान ट्रेडिंग दुकानाच्या बाजूला करंट लागून पहिल्या माळ्यावरून एक बंदर जखमी अवस्थेत पडून होता. याबाबत नागरिकांनी वनविभागाला माहिती दिली असता तात्काळ वनरक्षक बी.पी.राठोड यांनी जलद बचाव सदस्यांना घेऊन घटनास्थळी धाव घेत त्याला पकडून वनपरीक्षेत्र कार्यालय येथे नेले व त्याच्यावर उपचार करण्यात आले. प्रकृती ठीक होताच सोडण्यात आले.
कुठेही वन्यप्राणी जखमी, आजारी व लोक वस्तीत आढळल्यास या बाबत तत्काळ वन विभागाला माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
संपूर्ण कारवाई उप वनसंरक्षक मिलीश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक सोनल भडके, वन परिक्षेत्र अधिकारी अरविंद पेंदाम, क्षेत्रसहाय्यक श्रीकांत नवघरे, वनरक्षक भारत राठोड, जलद बचाव दल सदस्य अजय कुकडकर, मकसुद सय्यद, पंकज फरकाडे, गुणवंत बाबनवाडे, निखिल बारसागडे, ज्ञानेश्वर चुधरी, महेश राऊत, मोहित डोईजड, समीर बोरकुटे यांनी पार पाडली. जखमी माकडावर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष भोयर उपचार केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here