The गडविश्व
गडचिरोली, ९ ऑगस्ट : येथील पोदार जम्बो किड्स, विदर्भ इंटरनॅशनल स्कूल मधील प्री प्रायमरीच्या विद्यार्थ्यांना चंद्रयान – ३ च्या क्षेपणास्त्राची माहीत देण्यात आली. यामधे चंद्रयान – ३ कुठून आणि किती वाजता सोडण्यात आले, त्याचे महत्व काय, ते यशस्वी करण्यासाठी कोणी मेहनत घेतली या सर्वांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
विशेष म्हणजे व्हिडीओ द्वारे विद्यार्थ्यांना तो प्रसंग अनुभवता आला. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह दिसून येत होता. या सर्व माहितीमुळे विद्यार्थ्यांमधे वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यास मदत झाली.