ढाणकी शहरात व आजूबाजूच्या खेडेगावात अल्पवयीन दुचाकीस्वारांचा सुळसुळाट

231

– दुचाकीची अक्षरश: ‘पैज’, आवर घालने आवश्यक
The गडविश्व
प्रतिनिधी / ढाणकी, ९ ऑगस्ट : शहरी भागात आणि आता लहान खेडेगाव सुद्धा मोटर वाहनांच्या नियमांना सर्रासपणे बगल दिल्या जात आहे. यात अतिरेक म्हणजे ज्या मुलांचे पाय दुचाकीवरून खाली सुद्धा पुरत नाहीत अगदी लहान मुले स्वतःकडे लक्ष वेधून घेण्यासाठी हेतू पुरेसर सायलेन्सरला काही तांत्रिक अडचण आणून विशिष्ट असा मोठा आवाज येत असलेल्या मोटरसायकली मुख्य रहदारीच्या ठिकाणाहून अगदी सुसाट वेगाने पळवीत असल्याने वाटसरूंना, वृद्ध व्यक्तींना, दिव्यांगणा आणि विद्यार्थ्यासह अनेकांना जीव मुठीत धरूनच चालावे लागत आहे. त्यामुळे नक्कीच धोका संभवतो त्या अनुषंगाने संबंधित विभागासह पोलीस प्रशासनही या महत्त्वपूर्ण बाबीकडे लक्ष देऊन थेट कारवाई करण्यची निकड दिसत आहे.
संपूर्ण ढाणकी आणि परिसरात अशीच अवस्था असून याला आवर घालणारी यंत्रना कुठे वावरत आहे हे कळायला मार्ग नाही. संबंधित विभागाने याकडे तत्काळ हस्तक्षेप करून सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी होणारा धोका रोखण्यासाठी सुसाट अशा चालकाच्या विरोधात कडक व कठोर कारवाई करण्याची मागणी जनतेतून होत आहे. सध्या सगळीकडेच गुळगुळीत महामार्ग होत आहे व त्याचे होणारे काम ही शेवटच्या टप्प्यात असताना ग्रामीण खेडे गावातील अगदी कुमार अल्पवयीन राजाधिराज असे महाविद्यालयीन विद्यार्थी स्वतःकडे लक्ष खेचून घेण्यासाठी शालेय विद्यार्थिनींच्या समोर आपल्या मर्कटलीला दाखवून मोठा सायलेन्सरचा आवाज करत गजबजलेल्या चौकामधून दुचाकी पळविताना दिसून येत आहे. अत्यंत अल्पवयीन असलेले मोटरसायकलस्वार व यांच्या विशिष्ट मुसाफिरिला पालकही तेवढे जबाबदार म्हणायचे का ? किंवा त्यांची पण कुठे मुक सहमती असल्याचे उघडचित्र सध्या ढाणकी सारख्या सामान्य शहरात दिसून येत आहे. महत्त्वाची बाब अशी की अत्यंत नादुरुस्त व भंगारच्या दुकानात ही त्या दुचाकीला किलोच्या स्वरूपात किंमत लागेल अशी वाहने त्यावर तीन ते चार जण स्वार होऊन अगदी जमेल तशी मनसोक्तपणे पळविणाऱ्या या दुचाकीस्वाराच्या हॉर्नचा व इंजिनचा होणारा कर्णकर्कश असे आवाज ध्वनिप्रदूषण तर होते शिवाय अपघाताच्या घटना सुद्धा येणाऱ्या काळात घडू शकतात तसेच अत्यंत वेगाने पळविणारे काही अल्पवयीन मुले कोणताही परवाना नसताना विचित्र क्रमांक ओळखू न येणाऱ्या क्रमांकाच्या पाट्या लावून इत्यादी सर्व बाबतीत संबंधित विभागाकडून अगोदरच कडक धोरण अवलंबवावे तसेच कोणत्याही प्रकारच्या कारवाई न केल्याच्या घटना घडल्याचे कधी ऐकिवात नसल्याने सर्वसामान्य नागरिकांसह वयोवृद्ध नागरिक खाजगी शिकवणी ला जाणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना नक्कीच धोका संभवतो शिवाय नको ती अवैधकाम ही अशा बाबीला पोषक ठरू शकतात त्यामुळे संबंधित विभागासह स्थानिक पोलीस प्रशासनाने ही या महत्त्वाच्या तितक्याच गंभीर बाबीकडे तत्काळ देऊन कुमारविराना व नको ती लाड हट्ट पुरविणाऱ्या पालकांवर ही कायदेशीर कारवाई करावी अशी अपेक्षा जनता बाळगून आहे.
(the gdv, the gadvishva, dhanki, talati recrutment 2023, talathi exam timetable, आदिवासी दिवस,Nagasaki Day, World indigenous day,Honda Sp160, Barcelona vs Tottenham, Siddique-Lal)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here