The गडविश्व
ता.प्र / आरमोरी, १० ऑगस्ट : येथील सत्तावीस वर्षीय विवाहीत इसमाने स्वतःच्या राहत्या घरी गळफास लावून जीवनयात्रा संपविल्याची घटना ९ ऑगस्ट रोजी घडली. विलास रुषी ढोडरे (२७) रा. आरमोरी (शेगावटोली) असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतक विलासची पत्नी दिपाली ही प्रकृती बरी नसल्याने चार दिवसांपासून आपल्या तीन वर्षांच्या मुलाला घेऊन माहेरी गेली होती. विलास काल ९ ऑगस्ट रोजी हा नेहमीप्रमाणे सायंकाळी कामावरून घरी आला. घराशेजारील सर्वांसोबत बोलणे चालणे झाले व स्वतः घरी जाऊन स्वयंपाक करून जेवण केले व घरी एकटाच असल्यामुळे भांडे साफसफाई करून विलास झोपी गेला. रात्री कोणत्या विचारात होता हे कोणालाही कळले नाही परंतु सकाळी त्याच्यासोबत कामावर जाणारे सोबती हा कामावर का आला नाही म्हणून घरी जाऊन दरवाजा ठोकून बघितले असता त्याचा कोणताही होकार न आल्याने त्यांनी दरवाजाला धक्का देऊन आत प्रवेश केला असता विलास हा पंख्याला दोरीने गळफास घेऊन अटकलेला दिसला. लगेच पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार देण्यात आली असता पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्वरित पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. विलासने गळफास कोणत्या कारणाने घेतला हे अद्याप कळू शकले नाही. त्याच्या पश्च्यात तीन वर्षांचा मुलगा व पत्नी असा त्याचा परिवार आहे. पुढील तपास सहायक महिला पोनि.शिंदे, पोलीस हवालदार केदार व वालदे करीत आहेत.
(the gadviahva, the gdv, armoei, gadchiroli, susude)