१५ ऑगस्ट ला यंदा गडचिरोलीत ‘या’ मंत्र्याद्वारे झेंडावंदन ; तर अजित पवार या ठिकाणी…

1271

– स्वातंत्र्य दिन झेंडावंदनाची यादी जाहीर
The गडविश्व
गडचिरोली, १० ऑगस्ट : स्वातंत्र्य दिन अवघा चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. मंत्रमंडळाचा नुकताच विस्तार झाला मात्र अद्याप काही जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची निश्चिती झालेली नाही. मात्र स्वातंत्र्य दिन नजीक असल्याने झेंडावंदन कोण करणार असा सवाल उपस्थित झाला असताना सरकारने झेंडावंदन करण्यासंदर्भात यादी जाहीर केली आहे. त्यामप्रमाणे गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्याचा झेंडावंदन तसेच इतर जिल्ह्यातील झेंडावंदन विविध मंत्र्याच्या तसेच काही जिल्हाधिकारी यांच्या हस्ते होणार आहे.

झेंडावंदन करणाऱ्या नेत्यांची यादी

देवेंद्र फडणवीस – नागपूर, अजित पवार – कोल्हापूर, छगन भुजबळ – अमरावती, सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर, चंद्रकांत पाटील – पुणे, दिलीप वळसे पाटील – वाशिम, राधाकृष्ण विखे पाटील – नगर, गिरीश महाजन – नाशिक, दादा भूसे – धुळे, गुलाबराव पाटील – जळगाव, रवींद्र चव्हाण – ठाणे, हसन मुश्रीफ – सोलापूर, दीपक केसरकर – सिंधूदूर्ग, उदय सावंत – रत्नागिरी, अतूल सावे – परभणी, संदीपान भुमरे, – औरंगाबाद, सुरेश खाडे – सांगली, विजयकुमार गावित – नंदूरबार, तानाजी सावंत – उस्मानाबाद, शंभूराजे देसाई – सातारा, अब्दुल सत्तार – जालना, संजय राठोड – यवतमाळ, धनंजय मुंडे – बीड, धर्मराव आत्राम – गडचिरोली, मंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगर, संजय बनसोडे – लातूर, अनिल पाटील – बुलडाणा, अदिती तटकरे – पालघर, रायगड – जिल्हाधिकारी, हिंगोली – जिल्हाधिकारी, वर्धा – जिल्हाधिकारी, गोंदिया – जिल्हाधिकारी, भंडारा – जिल्हाधिकारी, अकोला – जिल्हाधिकारी, नांदेड -जिल्हाधिकारी तर विभागीय आयुक्त कार्यालय कोकण भवन येथील ध्वजारोहण अप्पर आयुक्त कोकण भवन यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here