व्यायामशाळा / क्रीडांगण विकास व युवक कल्याण अनुदान योजनेअंतर्गत प्रस्ताव आमंत्रित

162

The गडविश्व
गडचिरोली, ११ ऑगस्ट : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरणाअंतर्गत सन 2023-24 या सत्राकरीता व्यायामशाळा विकास अनुदान योजना, क्रीडांगण विकास अनुदान योजना व युवक कल्याण विषयक अनुदान योजनेअंतर्गत या कार्यालयाकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहे.
तरुण पिढीमध्ये व्यायामाची आवड निर्माण करुन शरीर सुदृढ व निरोगी राहण्यासाठी तसेच क्रीडा संस्कृतीचे संवर्धन, प्रचार, प्रसार व जोपासणा करण्यासाठी व्यायामशाळा विकास अनुदान योजनेअंतर्गत ओपन जिम लावणे व व्यायाम साहित्य खरेदी करणे तसेच नविन व्यायामशाळा बांधकाम करणे या साठी अनुदान देण्यात येते. तसेच क्रीडांगण विकास अनुदान योजने अंतर्गत क्रीडांगण समपातळीत करणे, 200/400 मीटरचा धावणमार्ग तयार करणे, विविध खेळाची प्रमाणीत क्रीडांगणे तयार करणे, क्रीडांगणावर प्रसाधनगृहाचे बांधकाम करणे, भांडारगृह बांधणे, क्रीडांगणावर पाण्याची सुविधा निर्माण करणे, क्रीडांगणाभोवती भिंतीचे अथवा तारेचे कुंपन करणे इत्यादी बाबी करीता अनुदान उपलब्ध करुन देण्यात येते. सदर अनुदानाचा लाभ घेण्याकरीता जिल्ह्यातील जि.प. शाळा, अनुदानित माध्यमिक शाळा, महविद्यालये याशिवाय आदिवासी विकास विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या आश्रमशाळा तसेच ग्रामपंचायत, शासकीय यंत्रणा इत्यादींनी सदर योजनेचा लाभ घेऊन सुविधा निर्माण करण्याकरीता विहीत नमुन्यातील अर्जासह परिपुर्ण प्रस्ताव दि. 25 ऑगष्ट, 2023 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे सादर करावा.
सदर योजने संदर्भात अधिक माहिती व विहीत नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घेण्यासाठी इच्छुक शाळा/संस्थांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, क्रीडा व सांस्कृतीक भवन, कॉम्पलेक्स, गडचिरोली येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे जिल्ह क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here