उपपोस्टे रेगुंठा येथे नवीन प्रशासकीय ईमारत उद्घाटन सोहळा व भव्य महाजनजागरण मेळावा संपन्न

158

– मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची उपस्थिती
The गडविश्व
गडचिरोली, १२ ऑगस्ट : उपपोस्ट रेगुडा येथील नविन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन समारंभ तसेच गडचिरोली पोलीस दलाच्या “पोलीस दादालोरा खिडकी” चे माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील जनतेचे जीवनमान उंचवण्याच्या उद्देशाने उपपोस्ट रेगुंठा येथे भव्य महाजनजागरण मेळावा अन्न व औषध प्रशासन मंत्री, महाराष्ट्र राज्य, धर्मरावबाबा आत्राम सा. यांच्या उपस्थितीत आज १२ ऑगस्ट रोजी पार पडला.
यावेळी उपविभाग सिरांचा अंतर्गत उप-पोस्टे रेगुंठा हद्दीतील एकूण १००० पेक्षा जास्त आदिवासी बांधव, विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते. उपस्थित आदिवासी बांधवांना कार्यक्रमस्थळी विविध प्रकारचे साहित्यांचे वाटप करण्यात आले असून त्यात साडी, धोतर, व्हॉलीबॉल, क्रिकेट बैट, स्पे-पप, नोटबुक, कंपास, बॉलपेन, ब्लॅकेट, ताडपत्री, छत्री, व्हॉलीबॉल नेट, इत्यादी साहीत्यांचे वाटप करण्यात आले.
सदर मेळावा प्रसंगी प्रास्ताविक करतांना पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांनी सांगितले की, उप-पोस्टे रेगुला येथील सर्व अधिकारी / अंमलदार यानी कम्युनिटी पोलीसिंगचे काम चांगले केले असून येथील नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात १२० महिलांना उज्ज्वला गॅग कनेक्शन, शेतकऱ्यांना ५०% सवलतीच्या दरात बि-बियाने ६० आदिवासी जोडप्यांचा सामुहिक विवाह व शासकीय कागदपत्रे मिळवून देणे अशा प्रकारचं बरीच चांगली कामे केली गेली आहेत.
सदर कार्यक्रमात अन्न व औषध प्रशासन मंत्री, महाराष्ट्र राज्य, धर्मरावबाबा आत्राम सा यांनी उपस्थित नागरीकांना संबोधीत करतांना सांगीतले की, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे हे पोलीसांचे काम आहे, पण गडचिरोली पोलीस त्यापलीकडे जावुन सामाजीक बांधिलकी जपत “पोलीस दादालोरा खिडकीच्या” माध्यमातून या ठिकाणच्या लोकांसाठी विविध योजना राबवित आहेत, ही स्वरच अभिनंदनीय बाब आहे. नागरिकांनी देखील पोलीस दलाला जास्तीत जास्त सहकार्य करावे व स्वतःचा विकास साधावा. तसेच मा. पोलीस उप महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र संदीप पाटील सा. यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित करताना सांगितले की, सर्वांनी शिक्षण घेतले पाहीजे, शैक्षणिक दृष्टया आपण प्रगत झाले पाहीजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानाच्या माध्यमातुन शिक्षणाचा अधिकार दिला आहे. त्यांचे विचार जोपासून आपण आपली उन्नती करुन घेतली पाहीजे. तसेच उप-पोस्टे रेगुटा येथील सर्व पोलीस अधिकारी / अंमलदार यांची स्तुती केली.
आतापर्यंत गडचिरोली प्रशासनाकडुन पोलीस दादालौरा खिडकीच्या माध्यमातून सुरक्षा रक्षक १५५१, नर्सिंग असिस्टंट १२३७, हॉस्पिटॅलिटी ३२३, ऑटोमोबाईल २७६, इलेक्ट्रीशिअन २०१, सेल्समैन ०५, कंपनी रोजनदारी १५५, प्लम्बींग ३५, वेल्डींग ३८, जनरल ड्यूटी असिस्टंट ३८४, फील्ड ऑफीसर ११ व डीएलई ५२ असे एकूण ३२६८ गडचिरोली जिल्हयातील युवक/युवतींना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन (आत्मा) सोनापुर, गडचिरोली व बीओआय आरसेटी गडचिरोली यांचे मार्फत व्युटीपार्लर १७४, कुक्कुट पालन ५८५, बदक पालन १००, शेळी पालन १७७, शिवणकला २७७, मधुमक्षिका पालन ५३. फोटोग्राफी ६५, सॉफ्ट टाईज ७०, एमएससीआयटी २३१, चाहन चालक ५९२, भाजीपाला लागवड १३९५. पोलीसभरती पूर्व प्रशिक्षण १०६२, टू व्हिलर दुरुस्ती १३४, मत्स्यपालन ११२, बराहपालन १०, फास्ट फूड १३०, पापड लोणचे ५९, कराटे प्रशिक्षण ४८ असे एकूण ५२७४ युवक/युवतींना स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यात आले आहे.
सदर भव्य महाजन जागरण मेळाव्याच्या कार्यक्रमास अन्न व औषध प्रशासन मंत्री, महाराष्ट्र राज्य, धर्मरावबाबा आत्राम, पोलीस उप महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र संदीप पाटील सा., पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा., अपर पोलीस अधीक्षक, अहेरी यतिश देशमुख सा. व उपविभागीय पोलीस अधिकारी सिरोंचा सुहास शिंदे सा. हे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उप-पोस्टे रेगुंठाचे प्रभारी अधिकारी विजय सानप, समोनि कृष्णा काटे, पोउपनि सागर पाटील, पोठपनि सय्यद निजाम व सर्व अमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here