कुरखेडा : ‘ही’ ग्रामपंचायत गृह कर भरणाऱ्याला देणार ध्वजारोहणाचा मान

465

-ईश्वर चिठ्ठिने माजी सैनिकाने मिळविला ग्राम पंचायत कार्यालयचा ध्वजारोहण करण्याचा मान
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, १३ ऑगस्ट : तालुक्यातील ग्रामपंचायत गेवर्धा ग्रामपंचायात गृह कर भरणाऱ्या नागरिकाला १५ ऑगस्ट ला ध्वजारोहण करण्याचा मान देत आहे.
११ ऑगस्ट २०२३ रोजी ग्रामपंचायत गेवर्धा येथील सभागृहात २०२३- २०२४ या आर्थिक वर्षाचे १० ऑगस्ट २०२३ पर्यंत कराचा भरणा केलेल्या नागरिकामधून १५ ऑगस्ट २०२३ करिता ग्रा.पं. कार्यालय, भारतरत्न राजीव गांधी चौक, क्रांतिसुर्य बिरसा मुंडा चौक येथील ध्वजारोहण करण्याकरिता ईश्वर चिट्टीद्वारे निवड करण्यात आली.
यामध्ये ग्रा.पं. कार्यालय गेवर्धा येथील ध्वजारोहण कैलास बाळाजी कुथे, भारतरत्न राजीव गांधी चौक येथील ध्वजारोहण प्रमोद भाग्यवान नाकतोडे, तर क्रांतिसुर्य बिरसा मुंडा चौक येथील ध्वजारोहण नवनाथ शालिकराम गोबाडे यांना संधी उपलब्ध झाली आहे. तसेच ५ टक्के अबंध निधी ग्रामकोष समिती गेवर्धा आणि ग्रामकोष समिती खेडेगाव अंतर्गत अंगणवाडी विद्यार्थ्यांना गणवेश वितरीत करण्यात आले. व जि.प. शाळा खेडेगाव येथील परिसरात रॉयल पॉम झाडाची लागवड करण्यात आली.
याप्रसंगी सरपंच सुषमा मडावी, उपसरपंच ओमप्रकाश बोगा, ग्रा.पं.सदस्य रोशन सय्यद, तंटामुक्ती अध्यक्ष राजु बारई, ग्रामकोष समिती अध्यक्ष राजेंद्र कुमरे, ग्रामकोष समिती सदस्य भारती कराणकर, ग्रामकोष समिती खेडेगाव अध्यक्ष योगेश तुलावी, ग्रामकोष समिती सदस्य लता सुकारे, शाळा समिती सदस्य मंगला उईके, जि.प. शाळा खेडेगाव मुख्याध्यापक के.आर.कांबळे, शिक्षक शास्त्रकार, अंगणवाडी सेविका किसनाबाई गायकवाड, मदतनीस जास्वंदा बोरकर, अजय गायकवाड, कृष्णा नाकतोडे, नामदेव नखाते,नवनाथ गोबाडे, ग्रा.पं.कर्मचारी कृष्णा मस्के, दिनेश कावळे, अमिता नाहामूर्ते, राहुल नखाते, नानेश्वर मस्के उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here