The गडविश्व
चंद्रपूर, १५ ऑगस्ट : जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा चंद्रपूर च्या वतीने स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट २०२३ रोजी म्हणजेच स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव समाप्ती वर्ष निमित्त चंद्रपूर येथे सर्व विद्यार्थी, युवक, नागरीक यांच्या मनामध्ये देशभक्ती चे वातावरण निर्माण करण्याकरीता “५०० फुट अखंड तिरंगा यात्रा” सकाळी ९:३० ते दुपारी १२:३० या वेळेत काढण्यात येणार आहे.
या तिरंगा यात्रेमध्ये चंद्रपूर शहरातील विविध महाविद्यालय, वसतीगृह, क्लासेस चे विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. यात्रेचा मार्ग सरदार पटेल महाविद्यालय – गंज वार्ड – वरसिद्धी शॉपिंग मॉल – रघुवंशी कॉम्लेक्स – जटपुरा गेट – कस्तुरबा रोड – गिरनार चौक – सराफा लाईन – गांधी चौक अशाप्रकारे असणार आहे.
तिरंगा यात्रेचा समारोप शहरातील गांधी चौक येथील महानगर पालिका पार्कींग येथे जाहीर सभेने आणि माजी सैनीकांचे सत्काराने होणार आहे. तिरंगा यात्रमध्ये विशेष आकर्षण म्हणून शहीद स्मारक रथ, ढोल ताशा पथक, लेझिम पथक, वेशभूषा आदींचा समावेश असणार आहे. अभाविप विदर्भ प्रांत मंत्री शक्ती केराम यांनी बहुसंख्येने तिरंगा यात्रेत सामिल होण्याचे शहरवासियांना आवाहन केले आहे.