The गडविश्व
ता.प्र / धानोरा, १५ ऑगस्ट : स्थानिक धानोरा येथील श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री जी.सी.पाटील मुनघाटे महाविद्यालय धानोरा येथे १५ ऑगस्ट २०२३ रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य डॉ. पंकज चव्हाण यांच्या शुभहस्ते हजारोहण करण्यात आले तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मेरी मिट्टी मेरा देश या उपक्रमाच्या अंतर्गत व हर घर तिरंगा उपक्रमाच्या अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी आवळा, सिताफळ, करंजी गुलमोहर, आंबा, चिंच, वड इत्यादी फळझाडांचे रोपण करण्यात आले. तसेच हर घर तिरंगा या उपक्रमाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रभक्ती भावना जागृत होण्याकरीता हर घर तिरंगा उपक्रम १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान महाविद्यालयाच्याच्या वतीने साजरा करण्यात आज १५ ऑगस्ट ला या कार्यक्रमाची सांगता झाली.
याप्रसंगी श्री चिरंजीव देवनाथ गद्देवार महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी यांनी गणित विषयांमध्ये सेट परीक्षा उत्तीर्ण केली त्यामुळे त्यांच्या सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चव्हाण यांच्या शुभहस्ते करण्यात आले याप्रसंगी डॉ आर पी किरमिरे, डॉ.लांजेवार, डॉ. चुधरी, डॉ.जम्बेवार, रा से यो कार्यक्रम अधिकारी प्रा. ज्ञानेश बनसोड, डॉ.संजय मुरकुटे, प्रा. वाळके, डॉ. धवनकर, डॉ. गोहने, प्रा.तोंडरे, प्रा. पुण्यप्रेडीदवार, प्रा.धाकडे, प्रा.खोब्रागडे, प्रा. वाटक, प्रा.आवारी, प्रा रणदिवे, कायते, श्रीमती सज्जनपवार, श्रीमती छायाचंदेल, लांबट, गोहणे, प्रा. संजय मांडवकर, हर्षे वाढनकर, बालाजी राजगडे इत्यादी महाविद्यालयीन कर्मचारी वृंद रा.से यो स्वयंसेवक विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.