जैशच्या कमांडरसह पाच दहशतवाद्यांचा खात्मा : भारतीय सुरक्षा दलाला मोठे यश

194

The गडविश्व
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये चकमक उडाली. या चकमकीत पाच दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. यामध्ये जैश-ए-मोहम्मदचा कमांडर जाहिद वानी आणि एका पाकिस्तानी दहशतवाद्याचाही समावेश आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात शनिवारी अतिरेक्यांनी एका पोलिसाची गोळ्या झाडून हत्या केली होती.
“गेल्या १२ तासांत दोन चकमकीत पाकिस्तान प्रायोजित प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मदचे ५ दहशतवादी मारले गेले. यामध्ये जैश-ए-मोहम्मदचा कमांडर दहशतवादी जाहिद वानी आणि एका पाकिस्तानी दहशतवाद्याचा समावेश आहे. असे या चकमकीसंदर्भात माहिती देताना काश्मीर पोलिसांचे आयजी म्हणाले. ,
प्राप्त माहितीनुसार काल सुरक्षा दलांला पुलवामा जिल्ह्यातील नायरा भागात दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाल्यानंतर परिसरात कारवाई करण्यात आली. पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफचे संयुक्त पथक हे ऑपरेशन करत होते. कारवाई करत सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना ठार केले आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रेही जप्त करण्यात आली. यात जैश-ए-मोहम्मदचा कमांडर जाहिद वानीही सहभागी होता. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या दहशतवादी घटनेतही जाहिदचा सहभाग होता ज्यात ४० हून अधिक CRPF जवान शहीद झाले होते.
दुसरी चकमक बडगाम जिल्ह्यातील चरारे शरीफ येथे झाली. येथेही पोलीस आणि सीआरपीएफने मिळून संयुक्तरित्या ही कारवाई केली. या कारवाईत सुरक्षा दलांनी लष्कर-ए-तोयबाच्या एका दहशतवाद्याचा खात्मा केला. यावेळी सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांकडून AK-56 सह अनेक शस्त्रे जप्त केली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here