The गडविश्व
गडचिरोली, १७ ऑगस्ट : स्थानिक विदर्भ इंटरनॅशनल स्कूल येथे मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी ९ ऑगस्ट २०२३ रोजी निवडणूकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर निवडणूक प्रक्रियेतून शाळा प्रमुख (मुले) व शाळा प्रमुख (मुली) यांसह एकूण 16 विभागीय प्रमुखाची निवडणूक घेण्यात आली.
१४ ऑगस्ट १०२३ रोजी मंत्रिमंडळ स्थापन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी शाळेच्या प्राचार्या कुमारी नेहारिका मंदारे तसेच विभाग प्रमुख यांनी दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. कार्यक्रमाचे संचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रशांती वाघमारे यांनी केले. याप्रसंगी प्राचार्या नेहारिका मंदारे यांच्या हस्ते विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना बॅच आणि शिल्ड प्रदान करण्यात आले तसेच विजय झालेल्या विद्यार्थ्यांना प्राचार्यांच्या हस्ते शपथविधी देण्यात आला व वर्षभरात करण्यात येणाऱ्या कार्याबद्दलची माहिती पटवून देण्यात आली. तसेच उत्सुकतेने कार्य करण्यासाठी प्रोत्साहन पर गीत सादरीकरण संगीत शिक्षिका सपना राऊत यांनी केले. विद्यार्थ्यांना त्यांच्या निवड झालेल्या क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करण्यासाठी शाळेचे विभाग प्रमुख कुमारी श्रुती संगोजी यांनी प्रोत्साहन पर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी अतिशय मनमोहक नृत्य सादरीकरण केले. कार्यक्रमाचे आभार विद्यार्थिनी कुमारी श्रावणी चडगुलवार हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्यवस्थापन विभाग प्रमुख प्रीती मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.