समाज प्रबोधन करण्यासाठी वृत्तपत्र प्रभावी माध्यम

411

– आविसं सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम यांचे प्रतिपादन
The गडविश्व
वडसा , १८ ऑगस्ट : वृत्तपत्र या लेखात मुख्य शब्द वृत्त असा असला तरी केवळ वृत्त देणे एवढाच वृत्तपत्राचा आवाका नाही. वृत्तपत्रे ही वाचकांच्या जीवनाशी, विचारांशी, ध्येयवादाशी त्यांच्या सामान्य गरजा, त्यांचे प्रश्न त्यांवरील अन्याय, त्यांचे अभिमान, त्यांचे आनंद आणि दुःख ही अशा वेगवेगळ्या प्रसंगाशी समरस झालेली असते. इ.स. १८३२ मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी काढलेले दर्पण हे मराठी पत्रकारितेची गंगोत्री समजली जाते. वृत्तपत्रे ही अनेक पानांमध्ये प्रकाशित होत असतात. काही वृत्तपत्रे ही दररोज प्रकशित असतात, तर काही वृत्तपत्रे ही आठवड्याला , काही वृत्तपत्रे ही पंधरा दिवसांनी प्रकाशित होत असतात , काही वृत्तपत्रे ही दर महिन्याला प्रकाशित होत असतात, काही वृत्तपत्रे दर तीन महिन्याला प्रकाशित होतात, काही वृत्तपत्र ही दर सहा महिन्याला प्रकाशित होत असतात तर काही दर वर्षी प्रकाशित होत असतात. वृत्तपत्रांमधून आपल्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी, राजकारण, साहित्य, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक घडामोडी समजतात. वृत्तपत्रांद्वारे आपल्याला जगात कुठे काय घडले ते समजते. स्वातंत्र्यपूर्वी काळापासून ( लोकमान्य टिळक गोपाळ गणेश आगरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ) तसेच अनेक महापुरुषांनी आपल्या लेखनी च्या प्रभावातुन तसेच वृत्तपत्राच्या माध्यमातुन समाज प्रबोधन व समाज जागृती चे कार्य केले त्यामुळेच देश स्वातंत्र्य झाला. असल्याचे प्रतिपादन आविसं सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम यांनी केले.
देसाईगंज येथे आदिवासी विद्यार्थी संघटनेचे सरसेनापती नंदुभाऊ नरोटे यांनी प्रकाशित केलेल्या साप्ताहिक गडचिरोली टाईम्स या वृत्तपत्राचे विमोचन करतांना आदिवासी विध्यार्थी संघटनेचे सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम म्हणाले की स्वातंत्र्योत्त काळात ही देशात अनेक अनिष्ठ रुढी परंपरा सुरु असुन प्रस्थापित समाज व्यवस्थे कडुन दलित पिडित शोषित समाजावर आजही अन्याय अत्याचार होत असल्याच्या घटना घडत आहेत. हिंसाचार बलात्कार भ्रष्टाचार आर्थिक फसवनुक असे अनेक प्रकार देशातील विविध भागात घडतांना दिसतात. या सर्व समस्यांना वाचा फोडण्याचे काम समाजमाध्यम व वृत्तपत्राच्या माध्यमातुन दररोज होत असतांना आपणास पहावयास मिळते. शासन प्रशासन न्यायव्यवस्था यांचे काम सुरळीतपणे सुरु आहे. किंवा नाही याची मिमांसा करण्याचे काम वृत्तपत्र करते म्हनुण देशाचा चौथा आधारस्तंभ म्हनुण वृत्तपत्राची ओळख निर्माण आहे.
आविसं सरसेनापती नंदुभाऊ नरोटे समाजसेवी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात शैक्षणिक अवस्थेतुन त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांचे मोठे संघटन उभे करुन विद्यार्थ्यांच्या व तळागळातिल जनसमुदायाच्या समस्या मार्गी लावण्यासाठी अनेक आंदोलने केली प्रशासनाच्या विरोधात मोर्चे काढले वस्तिगृहे सुरु करुन विद्यार्थ्यांना सुविधा मिळावी यासाठी नेहमीच पाठपुरावा केला. आज जिल्ह्यामध्ये वसतीगृहे सुरळित सुरु आहे हे नंदुभाऊंच्या संघटनेचे फलित आहे. साप्ताहिक गडचिरोली टाईम्स या वृत्तपत्राच्या माध्यमातुन नवी चळवळ उभी करुन या जिल्ह्यातिल कृषी क्षेत्रातिल समस्यांसह बेरोजगारीच्या व सामाजिक धार्मिक राजकिय व शैक्षणिक समस्यांना वाचा फोडण्याचे काम नंदुभाऊ नरोटे यांच्या वृत्तपत्राच्या माध्यमातुन आपणास पाहण्यासाठी मिळेल असे मत बानय्या जनगाम यांनी या प्रसंगी व्यक्त केले. यावेळी सरपंच सुरज गावडे यांनीही शुभेच्छा दिल्या.
यावेळी आविसं सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम, सरपंच सुरज गावडे, गणेश राच्चावार व आविस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here