कुरखेडा : नवजात हत्या प्रकरणात नवा खुलासा…

1943

– नदी पात्रात आढळला होता मृत अर्भक
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, १९ ऑगस्ट : येथील नदी पात्रात दोन दिवसांपूर्वी एक दिवसाचा नवजात अर्भक गळा आवळून मारलेल्या स्थितीत आढळून आला होता. याबाबत पोलीसांनी कसुन तपास केला असता नवा खुलासा झाला असुन ज्या ठिकाणी महिलेची प्रसुती झाली तिथपर्यंत पोलीस पोहचण्यात यशस्वी झाल्याचे कळते. यामुळे आता या प्रकरणातील मुख्य आरोपी लवकरच ताब्यात घेण्यात पोलीसांना यश मिळणार असल्याचे बोलल्या जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, कुरखेडा तालुक्यातील कुभिटोला परिसरातील सती नदी पात्रात जोड्याच्या लेस ने एका दिवसाच्या नवजाताचा गळा आवळून खुन केलेल्या अवस्थेत एक अर्भक १७ ऑगस्ट रोजी आढळून आले होते. याप्रकरणी पोलीसांनी सदर प्रकरण हाती घेत कसुन तपास केला असता आता या प्रकरणात नवा खुलासा झाला असुन सदर महिलेची प्रसुती झालेले ठिकाण पोलीसांनी शोधुन काढले आहे. सदर महिलेची प्रसुती कुरखेडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारातील पडक्या स्थितीत असलेल्या जुन्या इमारतीमध्ये झाल्याची माहिती पोलीसांना मिळाली आहेे. सदर ठिकाणी प्रसुतीच्या खुणा आढळून आल्या असुन इतर साहित्य पोलीसांनी हस्तगत केले असल्याचीही माहिती आहे. या पडक्या इमारतीत ती गेल्या अनेक दिवसांपासून काही लोक वास्तव्यास असल्याची माहिती असून रात्री उशीरा सदर ठिकाणी पाळत ठेवली होती दरम्यान एक महिला व पुरूष सदर ठिकाणी दाखल झाल्यानंतर सापळा रचत पोलीसांनी त्यांना ताब्यात घेतल्याचेही कळते. तसेच सदर ठिकाणी प्रसुती झाल्याबाबत त्यांनी कबुली दिली असून कुरखेडा येथील एका महिलेने सदर प्रसुती करण्यास मदत केली असल्याची माहिती आहे. देह व्यवसायात सामील असलेल्या या महिलने नवजाताच्या गळ्याभोवती जोड्याची लेस आवळून हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या इमारतीत झाली प्रसूती…

प्रसूती झालेली सदर महिला व तिची साथीदार अद्याप पसार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहे. सदर घटनेमध्ये अजून कोण कोण समाविष्ट होते याचाही तपास पोलीस करीत असून लवकरच सर्व आरोपी पकडले जातील अशी आशा व्यक्त केली जात आहे. एकूणच सदर प्रकरण गंभीर असून कुरखेडा शहरात त्या ठिकाणी देहव्यापार चालत होता का ? याबाबत सुद्धा चर्चा सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here