– स्पर्श संस्थेचा उपक्रम
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २० ऑगस्ट : तालुक्यातील कारवाफा येथील माध्यमिक शासकीय आश्रम शाळेत शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यानी गडचिरोली स्पर्श संस्था आणि कैलास सत्यार्थी चिल्ड्रन्स फाऊंडेशन एक्स्प्रेस टू जस्टिन प्रकल्पा अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना जाणिव करुन देवुन याबाबत मुलामुलींना जागरूक करण्यासाठी कारवाफा आश्रम शाळेत एक दिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
खास करून आश्रम शाळेतील आदिवासी भागातील परिसरातील बाल विवाह आणि बाल लैंगिक अत्याचारांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हेच लक्षात घेऊन स्पर्श संस्था गडचिरोली व कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन एक्सेस टू जास्टिन प्रकल्पांतर्गत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा कारवाफा येथील विद्यार्थ्यांमध्ये बालविवाह बाललैंगिक अत्याचार व बाल तस्करी विरुद्ध जनजागृती करण्यात आली. सोबतच अशा पध्दतीचा अत्याचार कोणावर झाल्यास विद्यार्थ्यांना तक्रार करता यावी याबाबतित सविस्तर माहिती देण्यात आली. विद्यार्थ्याची या विषयावर त्यांचे मत जाणून घेण्यात आले आणि सविस्तर मार्गदर्शन स्पर्श समन्वयक लोकेश सोमनकर यांनी केले तर वैभव सोनटक्के क्षेत्र अधिकारी स्पर्श यांनी आदिवासी भागातून बालकांची तस्करी कशाप्रकारे केल्या जाते बालविवाह मुळे त्यांचे नुकसान कसे आणि कोणकोणत्या बाबतित होतात हे सांगून विद्यार्थ्याकडून बालविवाह विरुद्ध शपथ घेतली.
यावेळी मुख्याध्यापक विजय देवतळे माध्यमिक शिक्षक सुधीर शेंडे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.