– अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा
The गडविश्व
ता.प्र / आरमोरी, २२ ऑगस्ट : तालुक्यातील रामपुर व अन्य गावात गेल्या एप्रिल व मे महिन्याच्या कालावधीत वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या शेतातील नुकसानीचे पंचनामे केले परंतु त्यामध्ये रामपुर चक या गावात सिंचन क्षेत्र गाव नमुना 11 नुसार मका 20 हेक्टर व धान 150 हेक्टर उन्हाळी क्षेत्र दाखविला आहे.
परंतु यात 20 शेतकऱ्यांचे नांवे यादीत आल्याने असंख्य शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. यात 170 हेक्टर लागवडी खाली असताना यातील 56 हेक्टर पयत नुकसान झाली असल्यामुळे सुटलेले नावे नव्याने समाविष्ट करुण अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावे अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असा इशारा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नगरसेवक मिलिंद खोब्रागडे व गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी आरमोरी चे तहसिलदार श्रीहरी माने यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी आरमोरी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शालिक पत्रे, मा.उपसरपच सजय मडावी, मा.ग्रा.प.सदस्य रुमदेव सहारे, आनंदराव ढोगे घनश्याम डोलीकर, देवराव ठाकरे, सुरेश वाटगुरे, अशोक ठाकरे, रामु मडावी, शिवराम भेडारे, दामोधर मोहूले, शुकु मडावी, भाऊराव प्रधान, प्रभु राऊत, देवराव प्रधान, प्रेमदास ढोगे, किरण वाटगुरे, शिवाजी गुरुनुले, अभिमन सहारे, व्यकट माकडे, मुखरु ठेगरी, सुरेश चौधरी, प्रमोद बारापात्रे, नारायण वाटगुरे, बालाजी ठाकरे, आसाम प्रधान, एकनाथ सरपे, यादव भेडारे, किरण वाटगुरे, यश्वदा लेनगुरे, सितकुरा कुमरे, मनोहर प्रधान, तुकडोजी लोनारे, वसंत बारापात्रे, अशोक प्रधान, प्रभाकर ऊईके, श्रीरंग प्रधान, श्रीहरी ढोरे, अंबादास प्रधान, राजु ठाकरे, देविदास प्रधान, शामराव सरपे, बाबुराव शेन्डे, दिवाकर सरपे, बबन माकडे आदि उपस्थित होते.