जिल्हास्तरीय विज्ञान स्पर्धेत विदर्भ इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थिनीचे सुयश

179

The गडविश्व
गडचिरोली, २४ ऑगस्ट : अखिल भारतीय विज्ञान मेळाव्यात तालुकास्तरावर २०२२-२३ या शैक्षणिक सत्रामध्ये विदर्भ इंटरनॅशनल स्कूल ची इयत्ता ८ वी ची विद्यार्थिनी कु .साची महेंद्र लांजेवार हिने प्रथम क्रमांक पटकावत सुयश प्राप्त केले. तसेच पुढील फेरीसाठी जिल्हा स्तरावर जिल्हास्तरीय स्पर्धेत देखील दुसरा क्रमांक पटकाविला आहे.
विविध विज्ञान प्रयोगाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले होते. साची हिने Millets- A Super food or diet fad या विषयावर आधारित प्रयोग सादर केला. सदर प्रयोग निर्मितीसाठी विज्ञान शिक्षिका प्रतिभा कावळे यांनी मार्गदर्शन केले. कु . साची हिच्या ह्या उत्तुंग भरारी करिता शाळेच्या प्राचार्या नेहारिका मंदारे यांनी तालुका स्तरावर प्रथम व जिल्हा स्तरावर दुसरा क्रमांक मिळाल्याबद्दल कौतुक केले. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी देखील कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here