The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २८ ऑगस्ट : तालुक्यातील चातगाव व परिसरातील बालकावर होणारे अत्याचार थांबवुन त्यांचे होणारे बाल विवाह न करण्याची शपथ घेतली.
बालकांवर अत्याचाराविरुद्ध निर्णय घेण्यासाठी शासन निर्णयानुसार प्रत्येक गावामध्ये ग्राम संरक्षण समिती स्थापन करणे अनिवार्य आहे. स्पर्श संस्था गडचिरोली व कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन द्वारा संचालित प्रकल्पा अंतर्गत चातगाव येथील आयोजित ग्रामसभेत ग्राम संरक्षण समिती हा विषय घेण्यात आला. गावातील व परिसरातील बालकावर भविष्यात कुठल्याही प्रकारचा अन्याय, अत्याचार होऊ नये त्यांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष देण्यासाठी तितकाच महत्त्वाचा विषय असुन गावातील कुठल्याही बालकाचे अधिकाराचे उल्लंघन होनार नाही. गावात बाल विवाह होवू देणार नाही. याकरिता नेहमी सहकार्य करण्याची हमी गावकऱ्यांनी दिली.
यावेळी क्षेत्र अधिकारी वैभव सोनटक्के, यांनी बालविवाहाचे वाटचे प्रमाण व कारणे यावर सविस्तर मार्गदर्शन करुन सर्व नागरिकाकडून बालविवाह न करण्याची शपथ घेतली दिली.यावेळी चातगाव येथील सरपंच गोपाल उईके, ग्रामसेवक राठोड, उपसरपंच आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, इत्यादी तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.