पोलिस दादांकडे महिलांनी मागीतली दारूबंदीची ओवाळणी

772

-राखी विथ खाकी उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
-The गडविश्व
गडचिरोली, २ सप्टेंबर : जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशन, पोलिस मदत केंद्र व सीआरपीएफ कॅम्पमध्ये मुक्तिपथ गाव संघटनेच्या वतीने रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून राखी विथ खाकी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमातून महिलांनी पोलिस दादांना राखी बांधून आपापल्या परिसरात सुरु असलेल्या अवैध दारूविक्रीबाबतची माहिती दिली व दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्याची ओवाळणी मागितली.
सिरोचा पोलिस स्टेशन येथे राखी विथ खाकी कार्यक्रम घेण्यात आला. यात नवीन रुजू झालेले पोलिस निरीक्षक राठोड व पोलिस उपनिरीक्षकांच्या अधिकारी यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात विविध वॉर्डातील महिलांनी पोलिस जवानांना राखी बांधून आमच्या वॉर्डातील दारू बंदी करा अशी ओवाळणी मागणी केली. पत्तागुडम पोलिस मदत केंद्रात आयोजित कार्यक्रमात पात्तागुडम, रायगुडम, पेंड्याला या तिन्ही गावातील गाव संघटनेच्या महिलांनी पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधून आमच्या गावात दारू बंदी करण्याची मागणी केली. असरअली व बामणी पोलिस मदत केंद्रात देखील कार्यक्रम घेण्यात आला.चामोर्शी पोलीस स्टेशन येथे राखी विथ खाकी कार्यक्रमाचे आयोजन मुक्तीपथ गावसंघटनाच्या माध्यमातून केले होते. सदर कार्यक्रमामध्ये पोलिस निरीक्षक विजयानंद पाटील व इतर अधिकारी यांना गावसंघटनेच्या महिलांना ओवाळणी स्वरूपात दारूबंदी करण्याचे वचन मागितले. आष्टी पोलिस स्टेशनमध्ये आयोजित कार्यक्रमात ६० महिलांनी ५५ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधून दारूबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी केली. पोलिस स्टेशन घोट येथे रक्षाबंधन कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाकरीता घोट, कर्दुळ, निकतवाडा येथील गाव संघटनेच्या महिला व सरपंच दुधबावरे, तंटामुक्ती अध्यक्ष पोगुलवार यांनी पोलिस अधिकारी व जवानांना राखी बांधून ओवाळणी म्हणून गावातील दारू बंद करण्याची विनंती केली आहे.
एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम हेडरी पोलिस मदत केंद्र येथे राखी विथ खाकी कार्यक्रम सीआरपीएफचे पोलिस निरीक्षक अलोक्कुमार यांचे अध्यक्षतेत व प्रभारी अधिकारी महेश विधाते यांचे मार्गदर्शनात घेण्यात आला. प्रमुख उपस्थिती एसआरपीएफचे पोलिस निरीक्षक जी.जी. काकांनी, पीएसआय दिपक चव्हाण, पीएसआय राजू वाघमारे, पीएसआय दत्ता बराटे, पीएसआय कल्याणी पुट्टेवार, मुक्तिपथचे तालुका संघटक किशोर मलेवार, रवींद्र वैरागडे, मुक्तीपथ गावं संघटन सदस्य 24 व पोलिस कर्मचारी 130 उपस्थित होते. पोलिस मदत केंद्र आलदंडी येथे सीआरपीएफचे राकेश कुमार तसेच प्रभारी अधिकारी जनक वाकणकर, देवराम रेंगडे, कुंभार, भिंगारदिवे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. यावेळी १२० पोलिस दादांना गावातील २० राखी बांधली. हालेवारा पो.म.कें येथे सीआरपीएफ चे कमांडर सलमान खो, प्रभारी अक्षय पाटील, अबेराव, शेटीवार ,शेळके यांच्या उपस्थितीत राखी विथ खाकी कार्यक्रम घेण्यात आला. अतिदुर्गम भागातील कसनसुर उपपोलिस स्टेशनमध्ये प्रभारी धिरसिंग वसावे यांचे अध्यक्षतेत राखी विथ खाकी कार्यक्रम घेण्यात आला. प्रमुख उपस्थितीत पीएसआय रोहित जाधव, बाबुलाल बोरसे, परशुराम टिल्लो यांची होती.
धानोरा तालुक्यातील पोलिस मदत केंद्र मुरुमगाव येथे राखी विथ खाकी कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात एपीआय शिरसाट, पीएसआय ठेंग, चौधरी , गवळी , नैताम व पोलिस बांधव यांना मुक्तीपथ गाव संघटनेच्या वतीने राखी बांधून मुरूमगाव, पंनेमरा, रेंगागाव येथील दारू बंद करण्यासाठी ओवाळणी मागितली. पोलीस मदत केंद्र गट्टा येथे राखी विथ खाकी कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी परिसरातील गठ्ठा , गोटा , मुरगाव , जप्पी , भिंमपुर येथील महिला सहभागी झाल्या होत्या. पेंढरी येथील उपपोलीस स्टेशन येथे राखी विथ खाकी कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमात पोलीस अधिकारी व पोलीस बांधव यांना मुक्तीपथ गावसंघटनेच्या वतीने राखी बांधून पेंढरी, मासानदी व दुर्गापूर येथील दारू बंद करण्यासाठी ओवाळणी मागितली. अतिदुर्गम पोलिस मदत केंद्र कट्टेझरी -2 येथे पोलिस प्रभारी अधिकारी साळवे यांच्या अध्यक्षतेत तसेच PSI भोसले, PSI नल्लावार यांच्या प्रमुख उपस्थितीत राखी विथ खाकी कार्यक्रम घेण्यात आला. मुक्तीपथ गाव संघटनेच्या 15 महीला 65 पोलीस बांधव कार्यक्रमाला उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here