कुरखेडा : अर्भकाची हत्या प्रकरणी तरुणीसह प्रियकराला अटक

3105

– तीन दिवसांची पोलीस कोठडी
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा (चेतन गहाने),३ सप्टेंबर : तालुक्यातील सती नदी पात्रात मृतावस्थेत आढळलेल्या नवजात अर्भक प्रकरणी कुरखेडा पोलिसांनी छडा लावत कुमारी मातेसह तिचा प्रियकर व त्याला मदत करणाऱ्या इसमाला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १६ ऑगस्ट रोजी सती नदी पात्रात नवजात अर्भक मृतावस्थेत आढळून आले होते. सदर घटनेने परिसरात एकचं खळबळ उडाली होती. या प्रकरणी कुरखेडा पोलिसांनी तापसाची चक्रे अधिक गतीने फिरविली असता अर्भकाची माता चांदनी (२२), प्रियकर संतोष हर्षे (२८) रा. गिलगाव तर अर्भकाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत करणारा दिलीप रोकडे (४०) रा. कुरखेडा यास पोलिसांनी अटक केली. दरम्यान आरोपींना कुरखेडा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर कारवाई पोलिस निरिक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

अर्भकाच्या गळ्याभोवती बुटाची लेस

सती नदी पात्रात मृतावस्थेत अर्भक आढळून आला होता त्यावेळी त्या अर्भकाच्या गळ्याभोवती बुटाची लेस गुंडाळून होती शिवाय डोक्यावरही मार होता. त्यामुळे त्याचा गळा घोटून जीव घेण्यात आला असे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीना अटक केली. सदर प्रकरणात प्रसूती झालेल्या मुलीच्या आईला अटक करून न्यायालयीन कोठडीत चंद्रपूर येथे रवानगी करण्यात आल्याचे कळते.

संबंधित बातम्या :
कुरखेडा : सती नदी पात्रात आढळला नवजात अर्भक

कुरखेडा : नवजात हत्या प्रकरणात नवा खुलासा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here