कोकडकसा येथे झाले एकल विद्यालयाचे उदघाटन

130

The गडविश्व
चातगाव, ४ सप्टेंबर : धानोरा तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या कोकडकसा येथे कै.लक्ष्मणराव मानकर स्मुर्ती संस्था नागपूरच्या वतीने एकलव्य एकल विद्यालच्या शिकवणी वर्गाचे गाव भूम्या आणि गाव पाटील यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
सदर कार्यक्रमात गावातील महिला, पुरुष, आणि गावातील मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच संस्थेचे विभाग प्रमुख, पर्यवेक्षक, शिक्षक यांच्या उपस्थितीत मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, तसेच त्यांच गावचे मुले उच्चशिक्षित व्हावे या उद्देशाने गावचे सहकार्य मोठ्या प्रमाणात दिसून आले.
सर्व गावकऱ्यांनी संस्थेनेआमच्या मुलांकरिता एकल विद्यालय दिले त्यासाठी संस्थेचे व काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे आभार मानले व नेहमी सहकार्य करण्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here