The गडविश्व
ता. प्र / धानोरा, ४ सप्टेंबर : तालुक्यातील मुरूमगाव परिसरातील तुमडीकसा वरुण हिंरगे गावाला जाण्यासाठी फक्त पायवाट आहे. शासनाला पत्रव्यवहार करूनही यांच्या नशिबी असलेली पायवाट संपविण्यासाठी अखेर गावकऱ्यांनी पुढाकार घेत.सरकारची वाट न बघता गावकऱ्यांनी श्रमदानातून काम सुरू केले आहे.
मुरुमगाव वरून हिरंगे हे गाव ९ किलोमिटरचे अंतर आहे. परंतु या गावाला जाण्यासाठी रस्ता नाही. देश आझादी का अमृत महोत्सव धुमधडाक्यात साजरा करताना धानोरा तालुक्यातील मुरुमगाव परिसरातील डझनभर गावे आजही विकासा पासुन कोसोदुरच आहेत. स्वातंत्र्य मिळुन देशाने ७५ वर्ष पुर्ण केले. अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुका अतिदुर्गम नक्षलग्रस्त म्हणून ओळख आहे. परंतु अनेक गावात जाण्याकरिता पक्के रस्ते नाहीत. त्यापैकीच हिरंगे ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या तुमडीकसा येथील लोकांनी अनेकवेळा खासदार, आमदार व जिल्हाधकारी व लोकप्रतिनिधींना गावातील रस्ता बनवण्यासाठी निवेदन देण्यात आले. पण कोणीही याकडे लक्ष दिले नाही त्यामुळे नागरिकांना ऊन, वारा, पावसात चिखलातून जाणे येणे करावे लागते किंवा एखादी व्यक्ती आजारी पडली तर त्यांना खूप अडचणीचा सामना करावा लागतो त्यासाठी हीरंगे व तुमडीकसा गावातील जनतेने श्रमदानातून रस्ता तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. अशाप्रकारे कटेझरी वरून चारवाही, लहान झेलिया, गुरेकसा व कुलभट्टी वरून बोधनखेडा या गावांना जाण्याकरिता रस्ता नाही तर महामंडळाची बस कशी पोहचणार. येत्या निवडणुकीत मत मागायला येणाऱ्या नेत्याना जाब विचारू असे गावातील लोकांचे म्हणणे आहे. परिसरातील मागासले पणाबाबत नागरिकामध्ये तीव्र नाराजी दिसून येते.