धानोरा येथे तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा संपन्न

211

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ७ सप्टेंबर : येथील जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा आज ७ सप्टेंबर रोजी संपन्न झाली.
सदर स्पर्धेकरिता तालुक्यातील विविध माध्यमिक शाळांनी सहभाग नोंदविला. सदर स्पर्धेत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय धानोरा येथील चमुने प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद हायस्कूल धानोरा येथील चमुने पटकावला. या स्पर्धेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रशांत साळवे प्रभारी मुख्याध्यापक तर उद्धाटक म्हणून सुधीर आखाडे, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, प्रमुख अतिथी म्हणून धर्मानंद मेश्राम, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी, सहारे सर साधन व्यक्ती, श्रीमती प्रेमिला दुगा मँडम, श्रीमती शर्मीष्ठा धाईत मॅडम, श्रीमती वालकर मॅडम, मोहन देवकते सर उपस्थित होते. स्पर्धेचे परीक्षक म्हणून अशोक पालवदे, महेंद्र कुकूडकर सर, निशिकांत शामकुळे सर यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर रत्नागिरी सर (विज्ञान शिक्षक) यांनी केले आभार मोहन देवकते सर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता शालेय कर्मचारी वर्गांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here