तालूका स्तरीय क्रीडा स्पर्धेत जय पेरसापेन हायस्कूल माळंदा अव्वल

277

The गडविश्व
ता. प्र / धानोरा, ९ सप्टेंबर : गडचिरोली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने तालूकास्तरीय क्रीडा स्पर्धा महेश सावकार पोरेड्डीवार हायस्कूल चातगाव येथे पार पडल्या. त्या स्पर्धेत जय पेरसापेन हायस्कूल माळंदाच्या चमूने १७ वर्षे वयोगट मुले-मुली खो-खो स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविले. १४ वर्षे वयोगट मुले खो-खो स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविले.
या यशाबद्दल अबूझमाळ शिक्षण मंडळाचे सचिव प्राचार्य एस.एस.पठाण, प्राचार्या लीना हकीम, तालुका क्रीडा सचिव एस.निंबार्ते, मुख्याध्यापक बढई, क्रीडा शिक्षक धुडसे, ए.बी.शेख, सी.डी.गद्देवार, एस.पी.मारकवार, जी.एन.ठमके, ए.एस.संतोषवार यांनी कौतुक केले. विजेत्या संघांने आपल्या यशाचे श्रेय शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व पालकांना दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here