गडचिरोलीचे भूमिगत गटार योजना त्वरित पूर्ण करा, अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती करा

159

– अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाची नगर परिषदेकडे मागणी
The गडविश्व
गडचिरोली, ११ सप्टेंबर : अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने नगर परिषदेंचे मुख्य अधिकारी पिदूरकर यांची भेट घेऊन शहरातील समस्यांचे एक निवेदन त्यांनां सादर केले.
गडचिरोली नगर परिषद क्षेत्रातील नागरीकांना बऱ्याच समस्याचा सामना करावा लागत आहे त्यामुळे नागरीक त्रस्त झाले आहेत. भुमिगत गटार योजना अजुनपर्यंत कार्यान्वीत झालेली नाही तसेच शहरातील बऱ्याचशा भागात भूमिगत गटार टाकण्यात आलेले नाही यामुळे बरेचसे नागरीक या गटार योजनेपासून वंचीत आहेत. कोट्यावधी रूपये खर्च करूनही योजना निरुपयोगी झाली आहे. तरी सदर भुमिगत गटार योजना पूर्ण करून कार्यान्वीत करण्यात यावी, शहरातील बऱ्याच वॉर्डातील अंतर्गत रस्ते खराब झालेले आहेत व त्यावरून वाहने चालविताना नागरीकांना त्रास होत आहे. तरी खराब रस्त्याची त्वरीत दुरुस्ती करण्यात यावी, शहरातील रस्त्याचे सिमेंटीकरण केल्यानं रस्त्याच्या दोन्ही बाजूची जागा मोकळी सोडण्यात आली व त्यामुळे रस्ते झालेले आहेत. यामुळे रहदारास अडचण निर्माण होत आहे. तरी या सर्व रस्त्याचे दुरुस्तीकरण करण्यात यावे, आरमोरी मार्गावरील सार्वजनीक संडास व मुत्रीघर कुलूपबंद असल्याने प्रवाशांना उघड्यावर लघवी करावी लागते तरी हे शौचालय तथा मुत्रीघर त्वरीत सुरू करण्यात यावे व त्या ठिकाणी नेहमी साफसफाई ठेवण्यात यावी. शहरातील बऱ्याचश्या रस्त्यावर मोकाट जनावरे बसून राहतात त्यामुळे अपघाताची शक्यता असते. तसेच रस्त्यावर वाहने सुध्दा उभी असतात, याचा त्वरीत बदोबस्त करण्यात यावा. गडचिरोली शहरातील झोपडपट्टी भागात राहणाऱ्या गरीब गरजू लोकांना घरकूल बांधून देण्यात यावे. गडचिरोली शहरातील सर्व झोपडपट्ट्यामध्ये पक्के रस्त्ये नाल्या व विजपुरवठा करण्यात यावा या सर्व झोपडपट्टी धारकाना नगर परिषदेचा टॅक्स लागू करण्यात यावा. गडचिरोली नगर परिषदेने आकारलेला अतिरीक्त व अनावश्यक कर (वृक्ष कर, विषेश शिक्षण कर) रद्द करून नव्याने कर आकारणी करण्यात यावी. चामोशी रोड बसस्टड जवळ सार्वजनीक मुत्रीघराची सोय करण्यात यावी. शहरातील नाल्याची नियमित सफाई करून निघालेल्या कचऱ्याची त्वरीत विल्हेवाट लावण्यात यावी. डास प्रतिरोधक फवारणी नियमित करावी, शहरातील बऱ्याच भागात गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामूळे नागरीकांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे तरी शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात यावा इत्यादी मागण्या निवेदनातुन करण्यात आला.
या सर्व मागण्याची यथाशिघ्र पुर्तता करण्यात यावी व शहरातील नागरीकांना दिलासा देण्यात यावा. मागण्यांची पुर्तता न झाल्यास अखिल भारतीय रिपब्लीकन पक्षातर्फे तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला.
या शिष्टमंडळात रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष हंसराज उंदीरवाडे, प्रदेश उपाध्यक्ष प्रा प्रकाश दुधे, प्रदेश सचिव प्रा. राजन बोरकर, प्रदीप भैसारे, जिल्हा सरचिटणीस प्रल्हाद रायपुरे कार्यालय सचिव अशोक खोब्रागडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष नीता सहारे, शहर अध्य्क्ष वनमाला झाडे , शहर उपाध्यक्ष ज्योती चौधरी , युवक आघाडी जिल्हाध्यक्ष नरेंद्र रायपुरे इत्यादी कार्यकर्त्यांचा समावेश होता.
या सर्व मागण्यांवर मुख्याधिकारी यांनी सविस्तर चर्चा केली या योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here