पावसाळी शिबीरामधुन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव : पोलीस अधीक्षक नीलोत्पल

95

-प्रोजेक्ट उडाण अंतर्गत अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी पावसाळी शिबिर संपन्न
The गडविश्व
गडचिरोली, १० सप्टेंबर : जिल्हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल जिल्हा असून दुर्गम अतिदुर्गम भागात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, बौद्धीक विकास व्हावा, त्याच्या विविध कलागुणांना वाव मिळावा, त्यांना मनोरंजनात्मक बाबींचा आनंद घेता यावा या उद्देशाने, पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांचे संकल्पनेतून गडचिरोली जिल्ह्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येत असलेल्या विविध आश्रम शाळेतील विद्याथ्यांकरीता गडचिरोली पोलीस दलाच्या ‘पोलीस दादालोरा खिडकी’ व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने तिसऱ्या पावसाळी शिबीराचे आयोजन ०५ ते १० सप्टेंबर २०२३ या कालावधीत करण्यात आले होते व आज १० सप्टेंबर २०२३ रोजी त्याचा समारोपीय कार्यक्रम पोलीस मुख्यालय, गडचिरोली याठिकाणी पार पडला.
आज झालेल्या समारोपीय कार्यक्रमामध्ये पावसाळी शिबीराकरीता सहभाग घेतलेले ८६ विद्यार्थी तसेच त्यांचेसोबत कवायत निर्देशक, योगा शिक्षक उपस्थित होते. शिबीरातील विदयार्थ्यांना संबोधीत करतांना पोलीस अधीक्षक यांनी सांगीतले की, आपण आपले ध्येय उच्च ठेवावे व ते गाठण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करुन आपल्या आई-वडीलांचे नाव आपल्यामुळे समाजात मोठे होईल यासाठी प्रयत्न करावे, अशा प्रकारे त्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. या आयोजित केलेल्या तिसऱ्या पावसाळी शिबीरादरम्यान सहभागी विद्यार्थ्यांनी योगा, ट्रैकिंग, स्विमींग, खेळाचा आनंद घेतला तसेच व्यक्तीमत्व विकासाचे प्रशिक्षण घेऊन चंद्रपूर जिल्ह्यातील वीसापूर येथील सैनिकी विद्यालय बॉटनिकल गार्डन, लाकडी डेपो, भद्रावती येथील विजासन टेकडी, ताडोबा जंगल सफारी, बटरफ्लाय गार्डन, तसेच त्यानंतर नागपूर येथील दीक्षाभूमी, रमन विज्ञान केंद्र व इतर विविध ठिकाणांना भेटी दिल्या.
गडचिरोली पोलीस दल व एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली यांच्या माध्यमातून एकुण ०५ टप्यांमध्ये ४०० विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी सदरचे शिबीर आयोजीत करण्यात आलेले आहे. पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांच्या मार्गदर्शनाखाली पावसाळी शिबीराकरीता ८६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या पावसाळी शिबीराकरीता पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे सा., अपर पोलीस अधीक्षक, अहेरी यतिश देशमुख सा. तसेच प्रकल्प अधिकारी, गडचिरोली प्रफुल पोरेड्डीवार, सहायक प्रकल्प अधिकारी, गडचिरोली सुधाकार गौरकार यांनी विदयार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता उपविभागातील सर्व पोस्टे / उपपोस्टे / पोमकेंचे प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि धनंजय पाटील व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here