गडचिरोली : १३८ किलो गांजा सह तिघांना अटक

1291

– गडचिरोली पोलीस दल एक्शन मोडवर
The गडविश्व
गडचिरोली, ११ सप्टेंबर : गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून केलेल्या कारवाईत चारचाकी वाहनासह १३८ किलो ५८० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. सदर कारवाईत अमली पदार्थ गांजा १३ लाख ८५ हजार ८०० रुपये व चारचाकी वाहन ७ लाख रुपये, मोबाईल १३ हजार रुपये असा एकूण २० लाख ९८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल पोलीस मदत केंद्र मुरूमगाव यांनी १० सप्टेंबर रोजी जप्त केला. याप्रकरणी उमर फैय्याज अहमद शेख (२८), राकेश राजु वरपेटी (२६), शहबाज सरवर खान (२७) यांना अटक करण्यात आली आहे.
गडचिरोली जिल्हयात अवैध अंमली पदार्थ तस्करी व इतर अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांनी कठोर कार्यवाहीचे निर्देश सर्व पोस्टे/उप-पोस्टे/पोमके प्रभारी अधिकारी यांना दिले आहेत.
१० सप्टेंबर रोजी सपोनि मिथुन सिरसाट, पोलीस मदत केंद्र मुरुमगाव यांना गोपनिय बातमीदाराकडुन खात्रीशीर माहिती मिळाली की, ३ अनोळखी इसम सिल्वर रंगाच्या होंडा सीटी कार क्र. एमएच-०४-सीएम-२५१५ मध्ये गांजा हे मादक पदार्थ बाळगुन छत्तीसगड राज्यातुन सावरगाव-मुरुमगाव मार्गे गडचिरोलीकडे येत आहेत. त्यावरुन मुरमगाव ता.धानोरा, जि गडचिरोली येथील कटेझरी जाणाऱ्या रोड समोरील बस स्थानकासमोर सापळा लावुन सदर कारला हात दाखवुन थांबवुन तपासणी केली असता कारमध्ये पिवळया रंगाची चुंगळी, सिल्वर रंगाची चुंगळी, पांढ­ऱ्या रंगाची चुंगळी असे ०३ चुंगळयामध्ये एकुण १३८ किलो ५८० ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थ (गांजा) अंदाजे किंमत १३ लाख ८५ हजार ८०० रुपये मिळुन आल्याने सदर गुन्हयात वापरलेली चारचाकी वाहन सिल्वर रंगाची होंडा सीटी कार क्र. एमएच-०४-सीएम-२५१५ किंमत ७ लाख रुपये तसेच दोन आरोपीकडे मिळालेल्या मोबाईलची किंमत १३ हजार रुपये असा एकुण २० लाख ९८ हजार ८०० रुपयेचा मुद्देमाल पोलीस मदत केंद्र मुरुमगाव येथे आणुन आरोपी उमर फैय्याज अहमद शेख (२८) व्यवसाय – वाहन चालक, रा.कमला रमननगर बेंगनवाडी जवळ रजा चौक गोपाल इलेक्ट्रेशन गोवंडी मुंबई-४३, राकेश राजु वरपेटी (२६), व्यवसाय-मजुरी, रा. सिघ्दार्थ रहिवासी सेवासंघ, टाटानगर, शिवाजीनगर एसओ मुबंई-४३, शहबाज सरवर खान (२७) व्यवसाय-वाहन चालक, रा. बिहॉयंन्डीग बिल्डींग नंबर-५३ जवळ आचार्य कॉलेज सुभाषनगर चेंबुर मुंबई-७१ यांचे विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे माहे जानेवारी २०२३ ते आतापर्यंत एकुण ४१६ किलो ३५९ ग्रॅम अंदाजे ५१ लाख ९१ हजार ४८० रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यास गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोमके मुरुमगावचे प्रभारी अधिकारी सपोनि मिथुन सिरसाट हे करीत आहेत.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे सा., अपर पोलीस अधीक्षक, अहेरी यतिश देशमुख सा. तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी धानोरा मयुर भुजबळ सा. यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस मदत केंद्र मुरुमगाव अधिकारी सपोनि मिथुन सिरसाट यांचे नेतृत्वात परि. पोउपनि राहुल चौधरी, पोहवा-नानाजी पित्तुलवार, पोअंम-दिलीप लंबुवार, पोअंम- तराचंद मोहुर्ले, पोअम-वाल्मीक कोटांगले, पोअंम-विनेश मांढरे, पोअंम-नितीन मडावी तसेचा राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 05 दौंड चे पोहवा-वैजीनाथ मदने, पोअंम-दिलीप काळे, पोअंम-दिपक जाधव तसेच सीआरपीएफ-113 बटा. चे पो.नि. मोहनसिंग व त्यांचे सोबत इतर कर्मचारी यांनी पार पाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here