‘बायको देता का बायको’ चित्रपटाचा ‘अल्ट्रा झकास’वर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर

656

The गडविश्व
मनोरंजन/ मुंबई, १२ सप्टेंबर : ऐन तरुणाईत लग्नासाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांना आज बायको मिळणं कठीण झालं आहे. पण असं का व्हावं? हा गंभीर मुद्दा आपल्या विनोदी ढंगात १८ सप्टेंबरला घेऊन येत आहे ‘बायको देता का बायको’ चित्रपट ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर.
जेव्हा योग्य वय येत तेव्हा प्रत्येकजण लग्न करण्याचा विचार करतो कारण लग्न हा आयुष्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. ‘बायको देता का बायको’ हा चित्रपट असाच एक चित्रपट आहे जिथे पुरूषांना योग्य नोकरी नसल्यामुळे बायको शोधण्यासाठी संघर्ष करावा लागतो. सुरेश साहेबराव ठाणगे दिग्दर्शित ‘बायको देता का बायको’ या धम्माल विनोदी चित्रपटात इरसाल विनोदी अभिनेते सुनील गोडबोले, सिद्धेश्वर झाडबुके, अभिलाषा पाटील, किशोर ढमाले, श्वेता कुलकर्णी, आरती तांबे, प्रतीक पडवळ इत्यादींच्या भूमिका आहेत.
“एकिकडे मुली उच्च शिक्षण घेत मोठ्या संख्येने मुले शिक्षणाकडे दुर्लक्ष करून वाईट वळणावर जात आहेत. या वाईट वळणाने त्यांच्या आयुष्यालाही वाईट कलाटणी मिळते आणि तेव्हा पश्चाताप करण्याशिवाय त्यांच्याकडे काही उरत नाही. म्हणून मुलांना मुली मिळणं कठीण झालं आहे. हा गंभीर मुद्दा सर्वांपर्यंत पोहचावा म्हणून विनोदी ढंगात बनलेला ‘बायको देता का बायको’ हा चित्रपट ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीच्या माध्यमातून आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहोत.” असे अल्ट्रा मिडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे सी.इ.ओ. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.
अधिक माहितीसाठी www.ultrajhakaas.com ला भेट द्या. गणरायाच्या आगमनाची तयारी करता करता झकास मनोरंजनासोबतच एकापेक्षा एक बहारदार धम्माल विनोदाची लज्जत अनुभवण्यासाठी लगेच डाउनलोड करा ‘अल्ट्रा झकास ओटीटी’ ॲप आणि तुमच्या कुटुंबासोबत अमर्याद आनंद घ्या अल्ट्रा झकास वरील एचडी कन्टेंटचा.
App link : https://ultrajhakaas.app.link

धम्माल विनोदी ‘बायको देता का बायको’ चित्रपटाचे प्रोमो पाहण्यासाठी लिंक
https://www.facebook.com/UltraJhakaas
https://www.instagram.com/ultrajhakaas
https://www.youtube.com/@ultrajhakaas
https://twitter.com/ultrajhakaas

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here