– वाहनचालक फरार, गुन्हा दाखल
The गडविश्व
चंद्रपूर, १२ सप्टेंबर : अवैधरित्या गोवंश कत्तलीसाठी घेवून जाणाऱ्या ट्रकसह २४ लाख १७ हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई चंद्रपूर गुन्हे शाखेने मंगळवार १२ सप्टेंबर रोजी केली. तर यातील आरोपी ट्रकचालक हा फरार आहे.
स्थानिक गुन्हे शाखेला मंगळवार १२ सप्टेंबर रोजी विरूर हददीतून राजूरा मार्गाने मालवाहू १६ चक्का ट्रकमध्ये अवैध्यरित्या जनावर भरून कत्तली करीता तेलंगाना राज्यात घेवून जाणार आहे अशी खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली असता स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. महेश कोंडावार यांनी स.पो.नि. जितेंद्र बोबडे, पो.हवा, सुरेंद्र महतो, ना.पो.कॉ. दिपक डोंगरे, गणेश मोहुर्ले, दिनेश अराडे, पो. कॉ. गणेश भोयर, गोपीनाथ नरोटे, प्रदीप मडावी, जय सिंग यांचे पथक कारवाई करीता नेमून सोनुर्ली फाटयाचे आधी रोडवर साफळा रचून नाकाबंदी केली असता. मिळालेल्या माहितीनुसार टीएस १२ युडी ९२३३ क्रमांकाचा ट्रक येतांना दिसला असता त्या ट्रक चालकास थांबण्याचा ईशारा केला मात्र तो पोलीसांना पाहून ट्रक न थांबविता पळाला दरम्यान पोलिसांनी पाठलाग केला असता चालकाने त्याचे ताब्यातील ट्रक सोनुर्ली फाट्या जवळ थांबवून ट्रक सोडून पसार झाला व पाठलाग केला असता तो मिळून आला नाही.
सदर ची पाहणी केली असता त्यात एकुण ३१ गोवंश ज्यात जिवंत गोवंशिय २० गाय व १० बैल जनावरे व ०१ गाय मृत अवस्थेत आढळून आली. त्यांची अंदाजे किंमत ४ लाख १७ हजार रुपये व ट्रकची किंमत २० लाख रुपये असा एकूण २४ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर फरार असलेल्या ट्रक चालका विरूद्ध पो.स्टे. विरूर येथे ४२९ भादवि सहकलम ११ (१) (ड) प्रा. नि. वा. कायदा १९६०, सहकलम ५ अ (1 ) ५ च,९,११ महा.प्रा. संरक्षण कायदा, सहकलम ८३,१३०/१७७ मोवाका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात स.पो.नि. जितेंद्र बोबडे, पो. हवा. सुरेंद्र महतो, ना.. पो. कॉ. दिपक डोंगरे, गणेश मोहुर्ले, दिनेश अराडे, पो. कॉ. गणेश भोयर, गोपीनाथ नरोटे, प्रदीप मडावी, जय सिंग यांनी केली असुन गुन्हयाचा पुढील तपास पो.स्टे. विरूर हे करीत आहे.