– मोठया उत्साहात तान्हा पोळा साजरा
The गडविश्व
ता.प्र / आरमोरी, १६ सप्टेंबर : शहरातील शास्त्रीनगरच्या तान्हा पोळ्याने आरमोरीकरांचे वेधले लक्ष असून मोठया उत्साहात तान्हा पोळा साजरा करण्यात आला.
आज नव्हे तर गेल्या अनेक वर्षापासून ही पोळा पद्धत आहे. बळीराजाचा खरा सखा हा बैलच आहे. बैलाचे महत्व लहान मुलांच्या देखील लक्षात यावे या अनुशंगाने वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. तालुक्यात अनेक गावांत तान्हा पोळा भरवला जातो मात्र आरमोरी येथे शास्त्रीनगर येथे पूर्ण आरमोरीकरांचे लक्ष वेधले असा भव्य तान्हा पोळा भरला असून नागरिकांना व बाळ गोपाळानी वेगवेगळ्या वेशभूषा व नंदी सजावट स्पर्धेत भाग घेऊन तान्हा पोळा मोठ्या जल्लोषात साजरा केला.
आरमोरी येथील संकट मोचन हनुमान देवस्थान शास्त्रीनगर आरमोरी द्वारा दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा तान्हा पोळाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये नंदी सजावट व वेशभूषा स्पर्धा ठेवण्यात आली होती. यावेळी प्रमुख उपस्थिती संदीप मंडलिक पोलीस निरीक्षक, वनपरिक्षेत्राधिकारी अविनाश मेश्राम, गोपिनाथ नखाते, दीपक बारापत्रे, शैलेश कावळे, डॉ राम राऊत, चंद्रभान निंबेकर,अतुल मने, रामभाऊ हेडावू , शुभम हुमने आदी व्यक्ती उपस्थित होते. तर स्पर्धेचे निरीक्षक रमेश घोनमोडे, विजय पत्रे, नितीन गडपायले, बालकदास कोटरगे, कुमुद खेवले, भाजीपाले, रोहनकर हे होते. यावेळी शंभराहून अधिक नंदी नी सहभाग दिला होता. त्यामध्ये नंदी सजावट मध्ये प्रथम क्रमांक तृप्ती कानकाटे, द्वितीय अंशुल कुंभारे, तृतीय आर्या बोरकर, प्रोत्साहन पर बक्षीस म्हणून तनिक्ष रामटेके यांना मिळाला, तर वेशभूषा स्पर्धेत प्रथम क्रमांक विराज धात्रक ग्रुप ने मिळवला तर द्वितीय पुरस्कार कौस्तुप ग्रुप, तृतीय पुरस्कार रियान सपाटे यांनी मिळवला. यावेळी विजेत्यांना रोख बक्षीस व शिल्ड प्रमुख उपस्थिती पाहुण्याच्या हस्ते देण्यात आली. स्पर्धेचे आयोजन संकट मोचन हनुमान देवस्थान शास्त्रीनगर चे आयोजक मंडळ भारत बावनथडे, प्रफुल निंबेकर, शंकर धकाते, गजानन पडगिलवार, टिंकू बोडे, अमोल खेडकर, त्रैलोक निंबेकर, रवी निंबेकर, अमित राठोड, मंगेश भोयर, सतिष चिलबुले, उत्सव आंबटवार, पंकज चिलबुले, भास्कर गाडेगोने, गोलू ठेंगरी,सोहम पत्रे,संजय सोनटक्के, आदी नि केली. यंदा सोहळा जवळपास रस्त्याच्या दुतर्फा नंदीच्या रांगा लागल्या होत्या यावर्षी हा सोहळा चांगलाच रंगला होता. यावेळी आरमोरीकरांनी बघण्याची मोठी गर्दी केली होती.
काय आहे तान्हा पोळ्याचे महत्व
विशेष म्हणजे विदर्भ वगळता अन्यत्र कोठेही अशा प्रकारचा तान्हा पोळा साजरा केला जात नाही. दुसरे श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले यांनी सन १८०६ मध्ये हा उत्सव सुरू केला. लहान मुलांना बैलांचे महत्त्व कळावे, असा उद्देश त्यामागे होता.