गडचिरोली जिल्हयातील पूरपरिस्थिती नियंत्रणात ; सेल्फीचा मोह करू नये

1605

– जिल्हाप्रशासनाच्या नागरिकांना सुचना
The गडविश्व
गडचिरोली, १७ सप्टेंबर : गोसेखुर्द धरणाच्या पाण्याच्या विसर्गाने वैनगंगा नदीसह इतर नदयांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने नदीकाठच्या गावात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे अनेक मुख्य मार्गासह इतर मार्गही बंद झाले होते. आता मात्र गोसेखुर्द धरणाचा विसर्ग काही प्रमाणात कमी करण्यात आल्याने पूरपरिस्थितीन नियंत्रणात असल्याचे गडचिरोली जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.
गोसेखुर्द धरणातून विसर्ग वाढल्याने अनेक नदयांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. अशातच याचा अनेकांना फटका बसला असून आता गोसेखुर्द धरणाचा विसर्ग कमी करण्यात आला असून आत २.८३ लक्ष क्युसेक पर्यंत टप्प्याटप्प्याने कमी करण्यात येत आहे. यामुळे जिल्हयातील बंद असलेले मार्ग सुरू होण्यास वेळ लागणार आहे. पूरबाधित क्षेत्रातील स्थलांतर केलेल्या नागरिकांना प्रशासनाकडून सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली आहे. तर एसडीआरएफ ची एक तुकडी काल सकाळपासून आरमोरी मुख्यालयी तैनात आहे. पूलावरून पाणी वाहत असतांना कोणत्याही परिस्थितीत पूल ओलांडू नये तसेच सेल्फीचा मोह करू नये असे आवाहनही जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

हे मार्ग आहेत बंद

१. अहेरी- मोयाबीनपेठा- वटरा (वटरा नाला) (तालुका अहेरी)
२. वडसा वळण रस्ता (तालुका देसाईगंज)
३. भेंडाळा-गणपुर बोरी (तालुका चामोर्शी)
४. शंकरपुर हेटी-मार्कन्डादेव-फराडा-मोहोली-
रामाळा-घारगांव-दोडकुली-हरणघाट रस्ता (तालुका चामोर्शी)
५. गडचिरोली -आरमोरी राष्ट्रीय महामार्ग (तालुका गडचिरोली)
६. गडचिरोली -चामोर्शी-आष्टी ( तालुका गडचिरोली)
७. आलापल्ली -आष्टी-गोंडपिपरी (चामोर्शी तालुका)

(the gdv, the gadvishva, gadchiroli news, armori, gosekhurd dam, vainganga rivier)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here