– धोकादायक निपाहचा अलर्ट, आरोग्य कर्मचारीही बाधीत
The गडविश्व
कोझिकोड, १७ सप्टेंबर : केरळमधील कोझिकोडमध्ये निपाह चा सहावा रूग्ण आढळून आल्याने राज्यातील सर्व शाळा महाविद्यालये, शिकवणी वर्ग २४ सप्टेंबर पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्याता आले आहे. तर केरळमध्ये सर्व प्रकारच्या शिक्षण संस्था १४ सप्टेंबरपासून बंद आहेत. निपाह बाधितांच्या संपर्कात आलेल्या लोकांची संख्या १०८ झाली असून यामध्ये ३२७ आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे असे केरळचे आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले आहे. तर कोझिकोड जिल्हयाच्या बाहेर बाधितांच्या संपर्कात आलेले २९ लोक आहेत.
कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये मलप्पूरमध्ये २२, वायनाड जिल्हयात एक व कन्नूर -त्रिशुर जिल्हयात प्रत्येकी तीन बाधित आढळून आले. ही संख्या वाढू शकते असेही डॉ. जॉर्ज म्हणाल्या. निपाह विषाणूनमुळ कोझिकोडमध्ये ३३० ऑगस्टला पहिला आणि ११ सप्टेंबरला दुसरा मृत्यू झाला होता. ३० ऑगस्ट रोजी मृताच्या अंत्यविधीला १७ लोक उपस्थित होते त्या सर्वांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक राजीव बहल यांनी शुक्रवारी सांगितले की, निपाह विषाणूमुळे मृत्यूचे प्रमाण ४० ते ७० टक्के आहे. कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या तुनलेत हे प्रमाण कितीतरी अधिक आहे. कोरोनाचा मृत्यूदर अवघा २-३ टक्के आहे. यामुळे आता सावधगिरी बाळगण्याचे आवाहन आयसीएमआरने केले आहे. तर केरळमधील लोकांना सामाजिक अंतर पाळण्याचा, मास्क घालण्याचा आणि वटवाघळांच्या संपर्कात आलेल्या कच्च्या अन्नापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.