देसाईगंज : अखेर ‘त्या’ वाघिणीस जेरबंद करण्यास वनविभागाला यश

731

– तालुक्यातील शेतशिवारात महिलेला केले होते ठार
The गडविश्व
ता. प्र / देसाईगंज, १७ सप्टेंबर : तालुक्यातील फरी येथील शेतशिवारात काम करत असतांना एका महिलेस वाघाने ठार केल्याची घटना ११ सप्टेंबर रोजी उघडकीस आली होती. त्या वाघाला जेरबंद कऱण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली होती. आता सदर वाघास जेरबंद करण्यास वनविभागास यश आले आहे अशी माहिती प्राप्त झाली आहे. सदर जेरबंद करण्यात आलेली हि मादी वाघ असून ‘टी-१४’ या नावाने ओळखल्या जाते.
देसाईगंज तालुक्यातील फरी येथील महानंदा दिनेश मोहुर्ले हि महिला शेतात काम करत असताना वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना ११ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली होती. यावेळी वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली होती. त्यानुसार वडसा वन विभागाचे सहाय्यक वन संरक्षक (ACF) मनोज चव्हाण यांनी ‘रेस्कु टीम’ ला पाचारण करीत शोधमोहीम राबविली असता सदर वाघिणीला शिवराजपुर जवळील चिखली रिठ येथील कक्ष क्रमांक-८६६ येथून आज सकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here