The गडविश्व
ता.प्र / धानोरा, १८ सप्टेंबर : आदिवासी विकास विभागाअंतर्गत कार्यरत शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील शिक्षकांचे विषय ज्ञान अद्ययावत राहण्यासाठी तसेच स्वयं अध्ययनाची आवड निर्माण व्हावी, स्पर्धात्मक वातावरणात स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळावी व विद्यार्थ्यांना चौफेर अध्याय व ज्ञान देण्यासाठी शिक्षकांची क्षमता अधिक दृढ व विकसित व्हावे या हेतूने आदिवासी विकास विभागात कार्यरत शासकीय व अनुदानित आश्रम शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांची क्षमता परीक्षा वर्ग १ ते १२ ला शिकविणारे सर्व अध्यापकांची क्षमता परीक्षा आदिवासी विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नाशिकने आज १७ सप्टेंबर २०२३ ला आयोजित केली असता सदर परिक्षेवर गडचिरोली जिल्ह्यातील अनुदानित आश्रमशाळा कर्मचारी संघटने तर्फे जिल्हाध्यक्ष सतिश पवार यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिक्षकांनी परिक्षा केंद्रावर जाऊन बहिष्कार टाकला.
विभागातील शासकीय व अनुदानित आश्रम शाळांमध्ये कार्यरत पहिली ते बारावी पर्यंतच्या शिक्षकांची SCERT/NCERT पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमावर आधारित क्षमता परीक्षा १७ सप्टेंबर २०२३ रोजी विभागा द्वारा आयोजित केलेली होती. ही परीक्षा सर्व शिक्षकांना अनिवार्य केले असतानाही अनुदानित शाळेतील शिक्षकांनी प्रत्यक्षात परिक्षा केंद्रावर जाऊन गडचिरोली जिल्ह्यातील अनुदानित संघटनेच्या वतिने बहिष्कार टाकण्यात आले. यात संघटनेच्या म्हणण्यानुसार ही परीक्षा घेण्या बाबतचे पत्र ५ संष्टेबरला म्हणजे शिक्षक दिनी का काढण्यात आले. आदिवासी विभागाने आयोजित सर्व परिक्षा घेऊनच शिक्षकांच्या पदांची नेमणूक केली आहे. अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागात विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम अध्यापक करिता असताना आता क्षमता चाचणी घेण्याचे कारण काय? आदिवासी विभागाला जर शिक्षकांचे ज्ञान वृद्धिंगत करायचे असेल तर प्रशिक्षण आयोजित करण्यात यावे. प्रशिक्षणाच्या माध्यमातून नवनवीन उपक्रम शिक्षका पर्यंत पोहचवा असे संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे आदिवासी विकास विभाग काय भुमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नागपुर विभागातिल ९९.९९ टक्के शिक्षक बहिष्कारात सहभागी असल्याचे कळते. गडचिरोली जिल्ह्यातील परिक्षा दिलेल्या शिक्षकांची संख्या ००, चंद्रपुरातील ००,वर्धा ००, नागपुरातिल ०२ (अनुदानित), चिमुर ०६ (अनुदानित नवनियुक्त), देवरी ०१ (शासकिय),भंडारा००, अहेरी १० (तासिका),भामरागड ०२ (तासिका), एकूण शिक्षकांपैकी फक्त २१ शिक्षकांनी परिक्षा दिल्याची माहिती आहे.