२४ ला लोकमान्य गणेश मंडळातर्फे निःशुल्क सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन

749

– जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, २२ सप्टेंबर : येथील आरमोरी मार्गावरील लोकमान्य गणेश मंडळातर्फे २४ सप्टेंबर रोजी निशुल्क सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
लोकमान्य गणेश मंडळ, गडचिरोली तर्फे दरवर्षी विविध कार्यक्रम, नाविन्यपूर्ण अभिनव उपक्रम राबविले जाते. त्याचाच एक भाग म्हणून २४ सप्टेंबर रोजी गणेश मंडळातर्फे इयत्ता ५ ते ८ पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी निशुल्क सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा २४ सप्टेंबर रोजी दुपारी १ ते २ या वेळेत सुमानंद हॉल, आरमोरी रोड, गडचिरोली येथे घेण्यात येणार आहे. याबाबतची माहिती सहरातील शाळेला सुद्धा देण्यात आली आहे. या स्पर्धेकरीता प्रवेश कमाल क्षमता ही केवळ ५०० असून नोंदणी प्रत्यक्ष परीक्षेचे ठिकाणी करावी लागणार आहे. तसेच सदर परीक्षेकरिता रिपोर्टिंग टाईम दुपारी १२.३० आहे. या स्पर्धेकरीता प्रथम बक्षीस ३ हजार रुपये, द्वितीय २ हजार रुपये तर तृतीय बक्षीस १ हजार रुपये ठेवण्यात आले आहे. अधिक महितीकरिता 8888668424, 7350262555, 9623192006, 9545113001 क्रमांकावर संपर्क साधावा तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवावा असे आवाहन लोकमान्य गणेश मंडळातर्फे करण्यात आले आहे.

स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांसाठी अटी व शर्ती

• विद्यार्थ्यांनी परीक्षेकरिता येतांना पाण्याची बॉटल, EXAM पॅड/रायटिंग पॅड/आयकार्ड स्वत: घेऊन यावे.
• परीक्षेदरम्यान कोणत्याही विद्यार्थ्यांना स्वत:जवळ मोबाईल, पुस्तके वापरता येणार नाही.
• परीक्षा झालेनंतर प्रश्नपत्रिका स्वत:सोबत घरी नेण्याची परवानगी आहे.
• या परीक्षेचे निकाल हे २४ सप्टेंबर २०२३ ला सायंकाळी ७ वाजता घोषित करण्यात येईल तर बक्षीस वितरण २७ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ८ वाजता असेल.
• सदर परीक्षेसंदर्भात सर्व टप्प्यांवरील अंतिम निर्णय हे लोकमान्य गणेश मंडळ, गडचिरोली यांचकडे राखीव असेल.

(the gdv, the gadvishva, gadchiroli news, lokmanya ganesh mandal gadchiroli, ganeshutsav 2023)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here