The गडविश्व
मुंबई : दहावी आणि बारावीच्या ऑफलाईन परीक्षा घेण्यासाठी आज विद्यार्थ्यांमार्फत आज आंदोलन करण्यात आले. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आंदोलनात सहभाग घेतला. या आंदोलनाची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस आयुक्तांना दिले आहेत. तसेच विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ज्या ज्या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. तेथील गर्दी नियंत्रणात आणण्याचे देखील आदेश वळसे पाटील यांनी दिले आहेत.
राज्यात अनेक ठिकाणी दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्याव्यात या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे विकास पाठक उर्फ ‘हिंदुस्थानी भाऊ’ चे नाव अनेक आंदोलक विद्यार्थांकडून घेण्यात आले आहे. त्यामुळे या आंदोलनामागे असणाऱ्या हिंदुस्थानी भाऊचा पोलिसांकडून शोध घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले असून, विद्यार्थांची डोकी भडकवणाऱ्या हिंदुस्थानी भाऊला अटक होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
विद्यार्थ्यांकडून पुणे, नागपूरसह मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जात आहे. दरम्यान, दहावी बारावी बोर्ड परीक्षा एक महिनाभर आलेली असताना दहावी बारावी बोर्ड परीक्षा नेमकी वेळापत्रकानुसार होणार की लांबणीवर जाणार? याबाबत सध्यातरी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने वेळापत्रकानुसारच होईल असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.