रांगी परिसरातील जिओ कंपनीच्या मोबाईल सेवेने जनता त्रस्त

174

The गडविश्व
ता. प्र / धानोरा, २८ सप्टेंबर : तालुक्यातील रांगी परिसरात मागील काही दिवसांपासून पासून जिओ कंपनीची मोबाईल सेवा वांरवार खंडित होत आहे. मात्र मागील दोन दिवसांपासून पुर्णपणे बंद असल्याने रांगी परिसरातील ग्राहकांना याचा नाहक त्रास सोसावा लागत आहे.
रांगी गावात परिसरातील मोबाईल सेवा पुरविण्यासाठी बिएसएनएल, आयडिया, पूर्वी पासुन असून त्याचे ग्राहक मोठ्या प्रमाणावर आहेत. मात्र जिओ इंटरनेट सेवेने परिसराला वेड लावले. त्यानंतर अनेकांनी जिओ सिम घेतले. इंटरनेट सेवा चांगली मिळाली पण अलिकडे टाँवर मधे काही समस्या निर्माण झाली का मानाने केली हे कळायला मार्ग नाही. सध्या हि सेवा विस्कळित झाल्याचे पहायला मिळते.
रांगी परिसरातील लोकांना 4G/5G सेवा देण्यासाठी जिओ कंपनीचे टावर उभे करण्यात आले. प्रथम धडाकेबाज सुरुवात करून परिसरातील लोकांना आकर्षित केले.लोकांनी मोठ्या प्रमाणात जिओचे सिम खरेदी केले. काहीनी पोर्ट करुन घेतले. पहाता पहाता वर्ष लोटले. परिसरातील जिओ ग्राहकांना चांगली सेवा मिळाली. पण अलिकडे काही दिवसांपासून जिओ सेवा वांरवार खंडित होतांना दिसते. कधि 2G तर कधि 4G सेवा मिळते कधितर तर पुर्णपणे बंद पडते. याचा ग्राहकांना मोठा फटका बसतांना दिसतो आहे.
या भागातील ग्राहकांनी इंटरनेट सुविधा मिळविण्यासाठी सिम खरेदी केले पण काही दिवसांपासून या सेवेत खंड का पडतोय यांचे कारण लोकांना कळलेच नाही. सिमकार्ड धारकांनी महिन्याचे रिचार्ज मारायचे आणि सेवा बरोबर मिळत नसेल तर कंपनीचे टावर कोणत्याही कामाचे नाही. कंपनी अशी वागत असेल तर लोकांना विचार करावा लागेल. 5G सेवा नाही पण 4G सेवा नियमित देण्यास कंपनी बांधील आहे. आणि ति द्यायलाच पाहिजे. अतिदुर्गम परिसरातील लोकांनी बिएसएनएल, आयडिया बंद केलेल्या लोकांना जिओ कंपनीने नियमित सेवा द्यावी जेने करुन लोकांना कंपनीला भरलेल्या पैशाचा पुरेपुर वापर होईल. जिओ मोबाईल कंपनीचे टावर रांगीत दोन तिन वर्षापूर्वी उभे करण्यात आले आहे. येथे अनेक कर्मचारी वास्तव्यात असतात, या गावात सभोवताल १५ ते २० गावांचा समावेश आहे. येथे बीएसएनएलचे टावर असून कव्हरेज राहत नाही. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते. परिणामी ग्राहक व नागरिकांच्या मागणीनुसार जिओ मोबाईल कंपनीचे टावर उभे करण्यात आले. याकडे आता तरी कंपनीने व संबंधित अधिकाऱ्याने लक्ष देऊन जिओ टाँवर ची सेवा नियमितची सेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी परिसरातील ग्राहक व नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here