आदिवासींच्या चक्काजाम आंदोलनाला प्रागतिक पक्षांचे समर्थन

198

The गडविश्व
गडचिरोली, २ ऑक्टोबर : धनगरांना आदिवासी जमातीचा दर्जा देण्याच्या निर्णयाच्या विरोधात खऱ्या आदिवासींनी केलेल्या चक्काजाम आंदोलनाला प्रागतिक पक्ष, महाराष्ट्र च्या वतीने प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी होत समर्थन देण्यात आले.
१ ऑक्टोबर रोजी गडचिरोली शहरात धनगरांना आदिवासी जमातीचा दर्जा देण्याच्या निर्णयाच्या विरोधात आदिवासी समाजतर्फे चक्का जाम आंदोलन करण्यात आले होते. यावेळी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. देवराव चवळे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे जिल्हा प्रभारी राज बन्सोड, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत मडावी, आदिवासी विकास युवा परिषदेचे विनोद मडावी यांनी या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होवून समर्थन दिले. या प्रसंगी रोहिदास राऊत आणि भाई रामदास जराते यांनी प्रागतिक पक्षांच्या वतीने आंदोलना संबोधित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here