खळबळजनक : बंद घरात आढळला महसुल कर्मचाऱ्याचा मृतदेह

205

– तर्क वितर्कांना उधाण
The गडविश्व
भंडारा, २ ऑक्टोबर : जिल्हातील तुमसर शरातील श्रीराम नगरमधील एका बंद घरात महसुल कर्मचाऱ्याचा मृतदेह ३० सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास आढळून आल्याची घटना समोर आली. सदर घटननेने एकच खळबळ उडाली असून तर्क वितर्कांना उधाण आले आहे. महेश विठ्ठलराव ढबाले (३१) असे मृत इसमाचे नाव आहे.
मृतक हा तुमसर शहरातील श्रीाराम नगरात वास्तव्यास होता. तो गोंदिया येथील तहसिल कार्यालयात महसुल सहाय्यक पदावर कार्यरत होता. तो अविवाहित होता अशीही माहीती असून घटनेच्या दिवशी घराजवळील नागरिकांनी खिडकीतून डोकावून बघितले असता तो मृतावस्थेळ आढळून आला. लागलीच याबाबतची माहिती पोलीसांना देण्यात आली असता तुमसर पोलीसांनी घटनास्थळ गाठून पुढील कार्यवाही केली. सदर घटनेने एकच खळबळ उडाली असून नेमका मृत्यू कसा झाला याचे कारण अदयाप कळू शकले नाही. पुढील तपास तुमसर पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here