The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २ ऑक्टोबर : जिल्हा परीषद हायस्कूल धानोरा येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी तथा स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ शिक्षक पी. व्ही.साळवे तर प्रमुख अतिथी डॉ.रश्मी डोके, पी.बी. तोटावार, ए.बी. कोल्हटकर, एस.एम. रत्नागिरी, कु.रजनी मडावी , कोरेवार मॅडम, चुधरी मॅडम ,ओम देशमुख होते.
कार्यक्रमाची सुरवात महात्मा गांधी तथा लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यारपण तसेच दीप प्रज्वलनाने करण्यात आले. यानंतर महात्मा गांघी चे आवडते भजन ” वैष्णव जन तो तेने काहिये” सामूहिक गायन करण्यात आले. वर्ग ५ ते १२ च्या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी तथा लालबहादूर शास्त्री यांच्या जीवन कार्यावर भाषण च्या माध्यमातून प्रकाश टाकला. प्रमुख अतिथी तोटावार यांनी सुंदर कथेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना माहिती दिली. अध्यक्ष स्थानावरून बोलताना साळवे यांनी लालबहादूर शास्त्री यांच्या जीवनावर प्रकाश टाकला आणि नेहमी सत्याचा मार्ग स्वीकारून देशाचे भविष्य उज्वल करण्याचे विद्यार्थ्याना आवाहन केले. याप्रसंगी विद्यार्थ्याना स्वच्छतेची शपथ देण्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन तथा आभारप्रदर्शन मोहन देवकाते यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करणेकरिता वर्ग ९ अ च्या विद्यार्थ्यांनी तसेच भालचंद्र कोटगले, कोरेटी यांनी मोलाचे सहकार्य केले.