The गडविश्व
गडचिरोली, २ ऑक्टोबर : तालुक्यातील जेप्रा येथील किसान विद्यालयात आज २ ऑक्टोबर २०२३ ला राष्ट्रपीता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीयांच्या जयंती साजरी करण्यात आली. तसेच यावेळी स्वच्छता रॅली काढण्यात असली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य मुकुंद म्हशाखेत्री यांनी प्रतीमेला मालार्पन केले, सहायक शिक्षक गुरुदेव चापले यांनी दिनविशेष कथन केले, याप्रसंगी विद्यालयाचे शिक्षक अरविंद ऊरकुडे, खुशाल दुमाने, सचीन म्हशाखेत्री, ओमदेव रडके, तिलेश मोहूर्ले, ऊज्वला तायडे, मिना म्हशाखेत्री, हजर होते, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन चंद्रसेन खोब्रागडे यांनी केले.