The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ३ ऑक्टोबर : तालुक्यातील ग्राम पंचायत रांगी येथे काल ०२ आक्टोबर २०२३ रोही गांधी जयंती दिनाच्या औचित्याने बाजार चौक परिसरात स.९.०० ते१०.०० या वेळेत १ तास महाश्रमदान करून चौक परिसर स्वच्छ करण्यात आले. नंतर ग्राम पंचायत कार्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाला सरपंचा फालेश्वरीताई गेडाम, शशिकांत साळवे ग्रा.प.स, दिनेश चापले, विद्याताई कपाट, वच्यला हलामी सर्व ग्रा.प.स.तसेच नरेंद्र भुरसे, प्रदीप गेडाम, देवराव कुनघाडकर, मुमताज पठाण, माधुरी हेमके, पूनम कावळे , रंगारीताई सर्व ब.ग.स., सुरेश राजगडे प्रा.आ., भुरसेताई आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन नितीन कावळे तर प्रास्ताविक बांबोळे सचिव ग्रा.प.यांनी केले. आभार नामदेव बैस यांनी मानले. ग्रा. प. कर्मचारी दीपक कुकडकर ,नितेश गेडाम, मंदाबाई वालदे, अरुण चापले यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले .