धानोरा येथे महसूल सप्ताहानिमित्त खा. अशोक नेते यांनी घेतला आढावा

281

– योजनांच्या अंमलबजावणीसाठी अधिकाऱ्यांना धरले धारेवर
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ४ ऑक्टोबर : भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा खासदार अशोक नेते यांनी ३ आक्टोबर २०२३ ला धानोरा येथील तहसील कार्यालयात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. यावेळी शासनाच्या कल्याणकारी योजनांचा जास्तीत जास्त लोकांना लाभ देण्यात हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलेच धारेवर धरले. कोणीही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घ्या, अशी सूचना त्यांनी केली.
महसूल सप्ताहानिमित्त घेतलेल्या या आढावा बैठकीला माजी जिल्हाध्यक्ष तथा जेष्ठ नेते साईनाथ साळवे, महिला मोर्चाच्या प्रदेश चिटणीस रेखा डोळस, धानोराच्या तहसीलदार आम्रपाली लोखंडे, बिडीओ टिचकुले, कृ.उ.बा.स.सभापती तथा माजी तालुका अध्यक्ष शशिकांत साळवे, भाजपा तालुकाध्यक्षा लता पुनघाटे, माजी पं.स.उपसभापती अनुसया कोरेटी यांच्यासह इतर विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here