– पोलीस शोधात, कुटुंबीयांची चिंता वाढली
The गडविश्व
गडचिरोली, ४ ऑक्टोबर : जिल्ह्यातील देसाईगंज शहरातील दोन विद्यार्थिनी बेपत्ता असल्याची माहिती पुढे येत आहे. यामुळे शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलिसांकडून शोधतपास सुरू आहे.
कांचन वंजारी व रेशमा धोटे दोघेही रा. भगतसिंह वार्ड अशी बेपत्ता विद्यार्थिंनीची नावे असून त्या आदर्श न्यू इंग्लिश हायस्कूलच्या मध्ये शिक्षण घेत असल्याचे कळते. कांचन ही सातव्या, तर रेशमा ही दहाव्या वर्गात शिकत आहे. नेहमीप्रमाणे काल मंगळवारी त्या शाळेत गेल्या असता शाळा सुटल्यानंतरही त्या घरी आल्या नाहीत. याबाबत शाळेत कुटुंबातील व्यक्तीने माहिती दिली असता त्यांनी सीसीटीव्ही फूटेज तपासले. त्यात दोघीही दुपारी १ वाजताच्या सुमारास अल्प विश्रांतीदरम्यान बाहेर पडताना दिसून आल्यात. याबाबत कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून शोधतपास सुरू असल्याचे कळते. विद्ययार्थीनी अचानक अश्या बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली असून कुटुंबियांची चिंता वाढलेली आहे. विद्यार्थिनी बेपत्ता होण्याचे नेमके प्रकरण काय आहे ? विद्यार्थिनी अचानकपणे बेपत्ता कुठे झाल्या ? याचा तपास पोलीस करीत असून बेपत्ता विद्यार्थिनी शोधून शोधून काढण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे आहे.
(the gadvishva, GADCHIROLI NEWS UPDATES, desaiganj, Desaiganj, Crime news)