जहाल महिला नक्षली कलावतीचे गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण

1176

-चकमक, खुन व जाळपोळीमध्ये होता सहभाग
– ११ लाखांचे बक्षीस होते तिच्यावर जाहीर
The गडविश्व
गडचिरोली, ८ ऑक्टोबर : चकमक, खुन व जाळपोळीमध्ये सहभाग असलेल्या सांड्रा दलमची एरीया कमेटी मेंबर जहाल महिला नक्षली रजनी ऊर्फ कलावती समय्या वेलादी (२८) रा. ईरुपगुट्टा, पो. भोपालपट्टनम जि. बिजापूर (छ.ग.) हिने गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले. आज ७ ऑक्टोबर रोजी पोलीस मुख्यालयात आत्मसमर्पित महिला नक्षलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांनी नक्षली चळवळीला सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात आल्याने सत्कार केला. यावेळी अपर पोलीस अधीक्षक अनुज तारे, कुमार चिंता, यतीश देशमुख उपस्थित होते.
     आत्मसमर्पित महिला नक्षली रजनीवर महाराष्ट्र शासनाने ०६ लाख तर छत्तीसगड सरकारने ०५ लाख असे एकूण ११ लाख रुपयांचे बक्षीस जाहिर  होते. दरम्यान शासनाने जाहीर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत आत्मसमर्पण केलेले असून त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे, दलममधील वरिष्ठ कॅडरचे माओवादी चळवळीकरीता/जनतेकरीता पैसे गोळा करायला लावतात मात्र प्रत्यक्षात गोळा केलेला पैसा ते स्वत:साठीच वापरतात जनतेच्या विकासासाठी कधीच वापरले जात नाही, नक्षल दलममधील जेष्ठ माओवाद्यांकडुन स्त्रीयांना भेदभावजनक वागणूक दिली जाते, वरीष्ठ माओवादी नेते फक्त स्वत:च्या फायद्यासाठी गरीब आदिवासी युवक-युवतींचा वापर करून घेतात, दलममध्ये असतांना विवाह झाले तरीही स्वतंत्र वैवाहिक आयुष्य जगता येत नाही, पोलीस दलाच्या सततच्या नक्षलविरोधी अभियानामुळे जंगलातील वावर धोकादायक झाला आहे, खबरी असल्याच्या फक्त संशयावरून आमच्याच बांधवांना ठार मारायला सांगतात, चकमकीदरम्यान पुरुष माओवादी पळून जाण्यात यशस्वी होतात, मात्र महिला यात ठार मारल्या जातात, नक्षल दलममध्ये अहोरात्र भटकंतीचे जीवन असून सुध्दा स्वत:च्या आरोग्याविषयी समस्या उद्भवल्यास त्याकडे काळजीपुर्वक लक्ष दिल्या जात नाही या कारणामुळे आत्मसमर्पण करीत असल्याचे सांगितले.

      रजनी ही ऑगस्ट २००९ ला फरसेगड दलममध्ये सदस्या पदावर भरती होऊन सन २०१० पर्यंत कार्यरत होती, २०१० ला ओरच्छा दलममध्ये बदली होऊन २०१३ पर्यंत कार्यरत होती, त्यानंतर २०१३ ला नॅशनल पार्क एरीया डॉक्टर टीममध्ये बदली होऊन एसीएम (एरीया कमीटी मेंबर) पदावर पदोन्नती होऊन २०१५ पर्यंत कार्यरत होती व २०२५ ला सांड्रा दलममध्ये बदली होऊन आजपर्यंत कार्यरत होती. तिने आपल्या कार्यकाळात ४ चकमक, १ खून व १ जाळपोळ केली आहे. २०१५ मध्ये गुंडम जंगल परिसरातील चकमक, डीआरजी (छ.ग.) चे १२ पोलीस जवान शहिद झालेली २०१७ ची बेज्जी ते येर्रागुफा मार्गावरील ॲम्ब्युश/चकमक, २०१८ मध्ये मारेवाडा जंगल परिसरातील चकमक व २०१९ मध्ये बोरामज्जी जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये सहभाग होता. तसेच २०२०-२१ मध्ये मध्ये उपराल (छत्ती.) येथील एका निरपराध इसमाच्या खुनात तिचा प्रत्यक्षरित्या सहभाग होता तर २०१८ मध्ये बेद्रे रोडवर सरकारी बसची जाळपोळ करण्यातही तिचा सहभाग होता.
आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडुन तिला एकुण ४ लाख ५० हजार रुपये बक्षीस जाहिर केले आहे. आजपर्यंत एकुण ५८६ माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे.

गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने नक्षलवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते 2023 सालामध्ये आतापर्यंत एकुण 13 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. विकासकामांना आडकाठी निर्माण करणा­या नक्षलवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्विकारावा.
– निलोत्पल, पोलीस अधीक्षक
गडचिरोली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here