The गडविश्व
गडचिरोली, ९ ऑक्टोबर : आगामी निवडणुका लक्ष्यात घेता काँग्रेस पक्षाला अधिक मजबूत करण्याकरीता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस च्या वतीने जिल्हानिहाय आढावा बैठक घेणे चालू केले असून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांच्या अध्यक्षतेखाली, राज्याचे विरोधी पक्षनेते ना. विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमीटीची आढावा बैठक १२ ऑक्टोबर २०२३ रोजी नागपूर येते पार पडणार आहे, त्या अनुषंगाने आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमीटी महासचिव विनोदजी दत्तात्रय यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली येथे जिल्हा काँग्रेस कमीटीची बैठक पार पडली.
या बैठकीत पक्ष संघटन अधिक मजबूत करणे व आतापर्यंत राबविण्यात आलेल्या काँग्रेस कमिटीच्या विविध उपक्रम आणि अभियानाची सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमीटी अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, माजी आमदार आनंदराव गेडाम, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव डॉ. नामदेव किरसान, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्व्जीत कोवासे, शहर अध्यक्ष सतीश विधाते, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, मिलिंद खोब्रागडे, प्रमोद भगत, रमेश गंपावार, राजेंद्र बुल्ले, सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, दामदेव मंडलवार, भारत येरमे, वामनराव सावसाकडे, दत्तात्रय खरवडे, रुपेश टिकले, पुष्पलता कुमरे, काँग्रेस नेते शंकरराव सालोटकर, रमेश चौधरी, प्रभाकर वासेकर, हरबाजी मोरे, विनोद लेनगुरे, रमेश कोडापे, राजाराम ठाकरे, श्रीकांत, तेलकुंटवार, दीपक रामने, आय. बी. शेख, कुलदीप इंदूरकर, दिलीप घोडाम, तेजस मडावी, अरुण पुण्यप्रेड्डीवार, दिगंबर धानोरकर, ढिवरू मेश्राम, रमेश धकाते, नृपेश नांदनकर, राजकुमार मेश्राम, स्वनील ताडाम, मुन्नासिंग चंदेल, अपर्णा खेवले, आशा मेश्राम, आरती लहरी, मंगला कोवे सह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.