– विविध मागण्यातुन वेधले लक्ष
The गडविश्व
गडचिरोली, ११ ऑक्टोबर : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गडचिरोली जिल्हा यांच्यातर्फे आज राज्य परिवहन महामंडळ गडचिरोली येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेत विविध समस्यांचा पाढाच वाचला.
यावेळी विदर्भ प्रांत मंत्री शक्ती जी केराम, जिल्हा संयोजक हिरालाल नुरूटी तसेच गडचिरोली आरमोरी भाग संयोजक प्रणय म्हस्के व गडचिरोली नगर मंत्री अभिलाष कुनघाडकर , नगर सह मंत्री पुनम कुंभरे व अभाविप चे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान यावेळी यावेळी अभाविप व विद्यार्थ्यांनी गडचिरोली आगारात आंदोलन करत संपूर्ण जिल्हावासीयांचे व उपस्थित प्रवाशांचे लक्ष वेधले व विविधी मागण्या संदर्भात निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले की, कित्येक विद्यार्थ्यांना रोज शाळेसाठी बस मिळत नसल्यामुळे ते सकाळी व सायंकाळी त्यांना शाळेत येण्यासाठी व घरी जाण्यासाठी उशीर होत आहे, राणखेडा या मार्गावर बस सेवा उपलब्ध नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे , गडचिरोली-चामोशी मार्गावर विद्यार्थी थांबून असतात व त्या मार्गावरील जास्तीत जास्त विद्यार्थी हे शाळेत जात असतात त्यामुळे तिथे बस अनेकवेळा थांबत नाही व कोंबून भरतात त्यामुळे काही अपघात होऊ शकते त्याची काळजी तुम्ही घ्यावी व लवकरात लवकर तिथे बस सेवा सुरळीत चालू करावे, बस ची दयनीय व्यवस्था असल्यामुळे कधी काही होण्याची शक्यता असते त्तसेच अपघात होऊ शकते व यांच्यामुळे विद्यार्थ्यांचे जीवन नष्ट सुद्धा होऊ शकते याची दखल तुम्ही घ्यावी, अनेक विद्यार्थी बस मध्ये प्रवास करत असतात, नवेगाव, मुरखळा, गोगाव, वाकडी अशा अनेक ठिकाणी बस थांबत नाही त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी खूप त्रास होत आहे व त्यांची शाळा जात आहे, अनेक शाळेचे प्राचार्य अनेक शाळेचे शिक्षक आपल्यापर्यंत येऊन गेले तरीसुद्धा तुमच्यामार्फत कोणताही प्रतिसाद नाही व अजूनही त्यांचे हाल तसेच होऊन राहिले आहे व कुठेतरी शिक्षण या कारणामुळे मागे पडत आहे याची तुम्ही दखल घ्यावी, केटेझरी, खुदगाव, कारवाफा अशा अनेक ठिकाणच्या भागातील विद्यार्थ्यांना मध्यंतरी शाळा सोडून यावं लागत आहे, चांदाळा, डोंगरगाव, विहिरगाव बस सेवा असूनही तिथं बस थांबत नसल्यामुळे अनेक नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना खूप त्रास होत आहे, कुंभीमोकासा, पोटेगाव, मुरमाडी या ठिकाणी अनेक विद्यार्थी शिकतात मात्र त्या ठिकाणचे विद्यार्थी हे गडचिरोली सुद्धा येतात, जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी हे दुर्गम भागातून येतात व अनेक विद्यार्थी पेपर देण्यासाठी विविध भागातून त्या त्या भागात जातात मात्र बस सेवा व्यवस्थित नसल्यामुळे ते वंचित राहत आहे एकूणच बससेवेअभावी मुलांचे भविष्य धोक्यात येत आहे त्यामुळे नियमित बस सेवा सुरू करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन यावेळी सादर केले. सदर मागण्या येत्या दहा दिवसांत पूर्ण न केल्यास अभाविप तीव्र आंदोलन करणार असा सुद्धा इशारा निवेदनातून केला आहे.सदर आंदोलनामुळे आता नियमित बस चालणार काय ? विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण होणार काय ? हा देखील प्रश्न उपस्थित होत असून जिल्ह्यातील अनेक भागात रस्त्यांची दयनीय अवस्था आहे त्यामुळे देखील बससेवा देण्यास अडथळा निर्माण होत असल्याचे कळते मात्र सर्व समस्येकडे प्रशासनाने गंभीरपणे दखल घेत समस्या सोडविणे आवश्यक आहे.