– १६ लाख रुपयांचे बक्षीस होते जाहीर, विविध घटनेत सहभाग
The गडविश्व
गडचिरोली, १४ ऑक्टोबर : छत्तीसगड व गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर घातपाताच्या उद्देशाने रेकी करीत असलेल्या जहाल नक्षलीस गडचिरोली पोलीस दलाने १४ ऑक्टोबर रोजी अटक केली. त्याच्या अटकेवर महाराष्ट्र शासनाने १६ लाखांचे बक्षिस जाहीर केले होते. याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी शनिवार १४ ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषदेतून दिली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे सा, अपर पोलीस पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता सा. अपर पोलीस अधीक्षक, अहेरी यतिश देशमुख सा. उपस्थित होते.
चैनुराम ऊर्फ सुक्कु वत्ते कोरसा (४८), रा. टेकामेट्टा, जि. नारायणपूर (छत्तीसगड) असे अटक करण्यात आलेल्या जहाल नक्षलीचे नाव आहे. हा गडचिरोली जिल्ह्राच्या सिमावर्ती भागातील कांकेर (छ.ग.) सिमेलगत असलेल्या पोस्टे जारावंडी व पेंढरी या दोन्ही पोस्टेची घातपात करण्याच्या उद्देशाने रेकी करण्यासाठी येणार असल्याच्या मिळालेल्या गोपनिय माहीतीच्या आधारे पोलीस स्टेशन जारावंडी हद्दीतील जारावंडी ते सोहगाव जाणाऱ्या रोडवरील कूरमावडा फाट्याजवळ विशेष अभियान पथकाचे जवानांनी नक्षलविरोधी अभियान राबवून त्यास अटक केली. २०२३ मध्ये हिक्केर जंगल परिसरात झालेल्या पोलीस नक्षल चकमकीवरुन पोस्टे एटापल्ली येथे कलम ३०७, ३५३, १४३,१४८,१४९, १२० (ब) भादवी, ३/२५, ५/२७ भारतीय हत्यार कायदा, ३, ४ भारतीय स्फोटक कायदा,१३५ महाराष्ट्र पोलीस कायदा व १३,१६, १८ (अ) युएपीए ॲक्ट अन्वये गुन्ह्रात अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे सा, अपर पोलीस पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता सा. अपर पोलीस अधीक्षक, अहेरी यतिश देशमुख सा. यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली.
अटक करण्यात आलेला नक्षकी हा २६ जुन २००० ला पर्लकोटा दलममध्ये सदस्य या पदावर भरती होऊन २००२ पर्यंत कार्यरत होता पुढे एसीएम पदावर पदोन्नती होऊन पुन्हा २००३ मध्ये डीव्हीसीएम पदावर पदोन्नती होऊन २०१४ पर्यंत माड डिव्हीजनमध्ये कार्यरत होता. २०१४ मध्ये डिव्हीसीएम पदावरुन डिमोशन होऊन एसीएम पदावर सप्लाय टीम/स्टाफ टीममध्ये त्याने काम केले. सप्लाय टीम/स्टाफ टीममध्ये २६ नोव्हेंबर २०१६ ला पुन्हा डीव्हीसीएम पदावर पदोन्नती होऊन सप्लाय टीम/स्टाफ टीममध्ये उप-कमांडर या पदावर आजपर्यंत काम केले आहे. या दरम्यानच्या कार्यकाळात त्याने ७ चकमक ल, १ खून असे गुन्हे केले आहे.
२००९ मध्ये पुंगड (छ.ग.),बालेवाडा (छ.ग.) चकमक,बाशिंग (छ.ग.) चकमक/अॅम्ब्युशमध्ये सहभाग.
२०१० मध्ये गरपा (छ.ग.) जंगल परिसरातील चकमक, २०११ मध्ये कोल्हार (छ.ग.) जंगल परिसरातील चकमक/अॅम्ब्युशमध्ये सहभाग, मे २०२० मध्ये पोयारकोठी जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये त्याचा सहभाग होता. ज्यामध्ये गडचिरोली पोलीस दलाचे एक पोलीस उपनिरीक्षक व एक पोलीस अंमलदार शहिद झाले होते तर २०२३ मध्ये हिक्केर (म.रा.) जंगल परिसरातील चकमकीमध्येही त्याचा सहभाग होता. तर २०१० मध्ये कोंगाल जि. नारायणपूर (छत्ती.) येथील एका निरपराध इसमाच्या खुनात त्याचा प्रत्यक्षरित्या सहभाग होता.
२०२२ पासून ७१ नक्षल्यांना अटक
पुढे पोलीस अधीक्षक निलोत्पल बोलतांना सांगितले की, गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे जानेवारी २०२२ ते आतापर्यंत एकुण ७१ माओवाद्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलेले आहे. माओवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जीवन जगावे असे आवाहन सुद्धा यावेळी केले.
(the gdv, the gadvishva, gadchiroli news, gadchiroli police, cg news, chattisgadh news, naxal arrest), kanker,)